मराठी बातम्या /बातम्या /देश /डॉक्टर दाम्पत्याची गर्भपातविरोधी मोहिम, कुमारी मातांच्या बालकांना घेतात दत्तक

डॉक्टर दाम्पत्याची गर्भपातविरोधी मोहिम, कुमारी मातांच्या बालकांना घेतात दत्तक

या उपक्रमाबाबत डॉ. ठक्कर यांनी सांगितलं, की मुलींनी जोडीदारासोबतच्या संबंधांची सीमारेषा ओलांडल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. चारित्र्यावर डाग लागू नये या भितीनं आणि कुटुंबाच्या दबावामुळे या मुली गर्भपात करण्यास तयार होतात.

या उपक्रमाबाबत डॉ. ठक्कर यांनी सांगितलं, की मुलींनी जोडीदारासोबतच्या संबंधांची सीमारेषा ओलांडल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. चारित्र्यावर डाग लागू नये या भितीनं आणि कुटुंबाच्या दबावामुळे या मुली गर्भपात करण्यास तयार होतात.

या उपक्रमाबाबत डॉ. ठक्कर यांनी सांगितलं, की मुलींनी जोडीदारासोबतच्या संबंधांची सीमारेषा ओलांडल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. चारित्र्यावर डाग लागू नये या भितीनं आणि कुटुंबाच्या दबावामुळे या मुली गर्भपात करण्यास तयार होतात.

    नवी दिल्ली 01 मार्च : अलीकडे अनेक कारणांमुळे गर्भपात(Abortion) करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. तसेच बेकायदेशीर गर्भपातामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचं आपण पाहतो. या पार्श्वभूमीवर महिलांना (Women) गर्भपातापासून परावृत्त करण्यासाठी, गर्भपात रोखण्यासाठी गुजरातमधील(Gujrat)एका डॉक्टर दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी मोहिम सुरु केली आहे.

    गुजरातमधील एका डॉक्टर दाम्पत्याने गर्भपाताविरोधात मोहिम सुरु केली आहे. यामाध्यमातून गर्भपाताविरोधात नवी व्याख्या करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डॉ.यामिनी आणि हितेष ठक्कर(Dr. Yamini And Hitesh Thakkar) कुमारी मातांना गर्भपात करु नये, बालकास जन्म द्यावा यासाठी त्यांना प्रेरित करीत आहेत. हे डॉक्टर दाम्पत्य कुमारी मातांनी जन्म दिलेल्या बालकांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करीत आहेत.

    दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, गुजरातमधील कच्छ भागातील अंजार येथे हे डॉक्टर दाम्पत्य हॉस्पिटल (Hospital) चालवतं. या हॉस्पिटलच्या माध्यमातून केवळ रुग्णसेवा, वैद्यकिय उपचार आणि व्यवसाय न करता त्यासोबतच सामाजिक आणि कौटुंबिक समस्यांचं निराकरण केलं जातं. ठक्कर दांपत्य सध्या अशा बालकांचे संगोपन करीत आहेत की ज्यांना सात कुमारी मातांनी जन्म दिलाय.

    या उपक्रमाबाबत डॉ. ठक्कर यांनी सांगितलं, की या मुलींनी जोडीदारासोबतच्या संबंधांची सीमारेषा ओलांडल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्यांच्या कुटुंबावर संकटांचा डोंगर कोसळतो. चारित्र्यावर डाग लागू नये या भितीनं आणि कुटुंबाच्या दबावामुळे या मुली गर्भपात करण्यास तयार होतात. गर्भपात करु नका, बालकास जन्म द्या, असे या मुलींना समजावण्याचा प्रयत्न आम्ही करतो. बालकाच्या जन्मानंतर जर त्याच्या आईने त्याला स्विकारण्यास नकार दिला तर आम्ही कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ते बालक दत्तक घेतो.

    एका घटना सांगताना हे डॉक्टर दांपत्य म्हणाले, की लग्नानंतर एक मुलगी सासरी गेली. काही दिवसांनंतर तिच्या सासऱ्याला कुठूनतरी कळालं की या मुलीला एक अपत्य आहे आणि त्याचं संगोपन आम्ही करतोय. त्यानंतर सासरची मंडळी आमच्याकडं आली आणि आम्ही या बालकाचे संगोपन करु इच्छितो असे म्हणाली. त्यानंतर आम्ही संबंधित बालक त्यांच्याकडं सोपवलं.

    समाजात जसं गर्भपाताला पाठिंबा देणारे लोक आहेत तसेच बाळांचा सांभाळ करणारं असं कुटंबही आहे हे वाचून नवल वाटेल पण समाजात अशी अनेक कुटुंब असतात. त्यांच्या चांगुलपणा समाजातील इतरांपर्यंत पोहोचायला हवा.

    First published:

    Tags: Adoption, Small baby