मराठी बातम्या /बातम्या /देश /

भय्यूजी महाराज ट्रस्टच्या संपत्तीवरून वाद, महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप

भय्यूजी महाराज ट्रस्टच्या संपत्तीवरून वाद, महाराजांच्या मुलीचे सावत्र आईवर गंभीर आरोप

मध्यप्रदेशच्या इंदूरमधील (Indore) भय्यूजी महाराज ट्रस्टच्या (Bhayyuji Maharaj Trust) 1 हजार कोटींच्या संपत्तीवरून (1 thousand crore property) वाद वाढत चालला आहे.

    इंदूर, 18 ऑगस्ट : मध्यप्रदेशच्या इंदूरमधील (Indore) भय्यूजी महाराज ट्रस्टच्या (Bhayyuji Maharaj Trust) 1 हजार कोटींच्या संपत्तीवरून (1 thousand crore property) वाद वाढत चालला आहे. भय्यूजी महाराजांची कन्या कुहूने (kuhu) आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस सुरक्षेची (police protection) मागणी केली आहे. आपल्या सावत्र आईने सर्व ट्रस्टी बदलले असून आपल्याला आर्थिक गैरव्यवहारांचा संशय येत असल्याचं म्हटलं आहे. काय आहे प्रकरण? मध्यप्रदेशमधील इंदूरमध्ये भय्यूजी महाराष्ट्र ट्रस्टची सुमारे 1 हजार कोटींची मालमत्ता आहे. या संपत्तीवरून त्यांची कन्या कुहू आणि पत्नी डॉ. आयुषी यांच्यात वाद सुरू आहेत. पुण्यात असणारी कुहू ही आता इंदूरमध्ये दाखल झाली असून ट्रस्टच्या कारभारात आर्थिक गडबड असल्याचा आरोप तिने केला आहे. आपल्या अपरोक्ष सावत्र आईने सर्वच्या सर्व 11 ट्स्ट्री बदलले असून आपल्या वडिलांप्रमाणे आपल्याही जीवाला धोका असल्याचं तिने म्हटलं आहे. बनावट सहीचा आरोप आपल्या अपरोक्ष अनेक कागदपत्रांवर आपल्या बनावट सह्या करण्यात आल्याचा आरोपही कुहूनं केला आहे. ट्रस्टचा कारभार नियमांनुसार सुरू राहावा आणि त्यात कुठलाही आर्थिक घोटाळा होऊ नये, यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचं कुहूनं म्हटलं आहे. कुहूच्या वकिलांनी केलेल्या दाव्यांनुसार ट्रस्टच्या कारभाराचा वार्षिक अहवाल दिला जात नाही. ऑडिट रिपोर्टही दिले जात नसून मिनिट ऑफ मिटिंग्जही उपलब्ध होत नसल्याची तक्रार  त्यांनी केली आहे. हे वाचा -तुरुंगातला एक दिवस; कर्नाटकात मांडण्यात आली तुरुंग पर्यटनाची संकल्पना भय्यूजी महाराजांनी केली होती आत्महत्या 12 जून 2018 या दिवशी भय्यूजी महाराजांनी कुहूच्या खोलीत स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. दुसऱ्या खोलीत पोलिसांना सुसाईट नोट सापडली होती. त्यामध्ये विनायकला आपला वारसदार बनवण्याची इच्छा भय्यूजी महाराजांनी व्यक्त केल्याचं नमूद होतं. मात्र या सुसाईट नोटवरदेखील संशय व्यक्त होत आहे. भय्यूजी महाराज कुठल्याही दस्तावेजातील प्रत्येक कागदावर सही करत असत. या नोटमध्ये मात्र त्यांची एकच सही असल्याने संशय निर्माण झाला होता.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Indore, Property issue

    पुढील बातम्या