नवी दिल्ली, 31 जुलै: सध्या देशात पेगासस प्रकरण (Pegasus Spyware) चांगलंच गाजतंय. या प्रकरणावरुन पावसाळी अधिवेशनातही गदारोळ झालेला पाहायला मिळतोय. विरोधक यावर आक्रमक झाले असून काल असाच एक गदारोळ न्यूज 18 इंडियाच्या डिबेट शोमध्ये पाहायला मिळाला. महिला काँग्रेस (Congress) नेत्या आणि भाजप (BJP) नेते ऑन स्क्रिन आपसात भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
भाजप महिला नेत्यांच्या कथित हेरगिरीबाबत जेव्हा डिबेट शोमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) यांनी प्रश्न उपस्थित केला तेव्हा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) भयंकर संतापले आणि त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं नाव घेऊन वैयक्तिक टिका केली.
न्यूज 18 इंडियाचा डिबेट शो आर पार मध्ये हा गदारोळ झाला आहे. या शोमध्ये सुप्रिया यांनी म्हटलं की, सरकार महिलांचे फोन तपासाच्या मुद्द्यावर का अडून बसली आहे? स्मृती ईराणी आणि वसुंधरा राजे यांना जाऊन जरा विचारा. यावर संबित पात्रा यांनी त्यांना टोकलं. तुमच्या पक्षातील कोणती महिला पीडित आहे? सोनिया गांधी या प्रकरणात पीडित असतील तर सांगा आम्हाला असं पात्रा यांनी म्हटलं.
#ShameOnSupriya https://t.co/zdJnfJw5JY
— Sambit Patra (@sambitswaraj) July 30, 2021
यावर सुप्रिया श्रीनेत यांनी उत्तर दिलं की, मी तर स्मृती ईराणी आणि वसुंधरा राजे यांना पीडित म्हणून बोलतेय. ते पीडित आहेत. ते पीडित आहेत. याच दरम्यान शो चे अँकर अमिश देवगन यांनी काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया यांना सांगितलं की, भाजपच्या महिला नेत्यांनी आपण पीडित आहोत असं म्हटलं नाही आहे. पण हे फक्त काँग्रेस म्हणत आहे.
त्यावर संबित पात्रा म्हणाले की, तुमचे बोलून झालं असेल तर मॅडम, मी बोलू का? आमच्या पक्षात कोण पीडित आणि कोण नाही ते आम्ही ठरवू. तुमच्या पक्षातून कोणत्या महिलेचे फोन आम्ही हॅक केले सांगा. त्या सांगत आहेत की आमच्या पक्षात अशी एकही महिला नाही.
पुढे संबित पात्रा बोलले की, त्या म्हणतायत की सर्व महिला भाजपच्या आहेत. कमालीची गोष्ट आहे ही. तुम्ही जगात असा विरोधी पक्ष कधी पाहिला आहे का?
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! खडकवासलानंतर हे धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर
संबित पात्रा यांच्या या वक्तव्यावर संतापलेल्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, माहित नाही त्यांना काय बघायचं आहे. खूप घाणेरडे लोक आहेत. देवालाच माहित महिलांच्या फोनमध्ये काय बघायचं आहे.
सुप्रिया श्रीनेत यांचं हे वक्तव्य ऐकून संबित पात्रा भलतेच भडकले आणि म्हणाले, हे तर तुम्ही राहुल गांधी यांना विचारा बँकॉकमध्ये काय करतात. ते सांगतील. बँकॉकमध्ये राहुल गांधी काय करतात ते सांगतील तुम्हाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Rahul gandhi