Home /News /national /

अयोध्येतल्या ‘दीपोत्सवा’मुळे राम मंदिराच्या कामांना लागला ब्रेक, ट्रस्टच्या सदस्यांनीच दिली माहिती

अयोध्येतल्या ‘दीपोत्सवा’मुळे राम मंदिराच्या कामांना लागला ब्रेक, ट्रस्टच्या सदस्यांनीच दिली माहिती

मंदिर एक हजार वर्ष टिकावं हे उद्दीष्ट ठेवून त्याची पायाभरणी करण्यात येत आहे. टाटांसोबतच IITचेन्नईचे तंत्रज्ञही या कामात मदत करत असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली.

    अयोध्या 17 नोव्हेंबर: अयोध्येत दिवाळीमध्ये जो दीपोत्सव (Dipotsava in Ayodhya) साजरा करण्यात आला त्यामुळे राम मंदिर निर्माण कार्यात अडथळा (Ram temple construction work) आल्याची माहिती श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी दिली आहे. मात्र आता पुन्हा वेगात हे काम सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सणांमुळे कामांना काहीचा उशीर झाला आहे. त्याचा रिपोर्ट लवकरच येणार असून त्यानंतर त्यावर उपाय योजना केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंदिर निर्माण कार्यात टाटा ट्रस्टचे इंजिनियर्स सहभागी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिवाळीच्या दिवशी अयोध्येतल्या शरयुच्या घाटांवर पाच लाखांपेक्षा जास्त दिवे लावण्यात आले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हा ड्रिम प्रोजेक्ट होता. हे मंदिर एक हजार वर्ष टिकावं हे उद्दीष्ट ठेवून त्याची पायाभरणी करण्यात येत आहे. टाटांसोबतच IITचेन्नईचे तंत्रज्ञही या कामात मदत करत असल्याची माहिती मिश्रा यांनी दिली. अयोध्येत शरयूच्या काठी शुक्रवारी संध्याकाळी 5.51 लाख मातीच्या पणत्या लावण्यात आल्या होत्या. राम जन्मभूमीच्या या रामलल्लाची पूजा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झाली आणि दीपोत्सवाला प्रारंभ झाला. रामजन्मभूमीवरच्या राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर अयोध्या आता मोठं पर्यटन केंद्र होण्याच्या वाटेवर आहे. संध्याकाली शरयूच्या घाटावर मंदिराच्या पार्श्वभूमीवर लेसर शो देखील आयोजित करण्यात आला होता. अयोध्येतले नागरिक उस्फूर्तपणे पाच लक्ष पणत्या लावण्याच्या उपक्रमात सामील झाले. हिंदू सणांमध्ये गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा आणि प्रमुख सण दिवाळी साजरा केला जातो. धनत्रयोदशीपासून या दीपावलीची सुरुवात होते. दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ करण्याची पद्धत आहे. यावेळी मान्सून संपलेला आणि शेतातलं पीक कापून घरात येत असतं. त्यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते. गणरायाला नमन केलं जातं. अंधकारावर मात करून दिव्यांनी किंवा प्रकाशानं तेजोमय करणारा हा उत्सव भारतात साजरा केला जातो. पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येत परतले होते. रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळवण्यात आली होती. सुख-समृदी वाईट किंवा अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणजे दीपावली. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Diwali 2020, Ram mandir ayodhya

    पुढील बातम्या