श्रीनगर, 21 मे : जम्मू-काश्मीरनमधील बीएसएफचे (BSF) दोन जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. त्याच्या काही मिनिटांपूर्वीच ते इफ्तारसाठी जेवण घेण्यासाठी गेले होते. यादरम्यान एका गर्दीच्या बाजारात बेकरीजवळून जाणाऱ्या मोटरसायकलवरील दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ज्यामध्ये बीएसएफ कॉन्स्टेबल जिया-उल-हक आणि राणा मंडल यांनी जागीत प्राण सोडले. आधिकाऱ्यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे.
बुधवारी सायंकाळी श्रीनगरच्या बाहेरील भागात हा हल्ला झाला. पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दे रेजिस्टेंस फ्रंट यांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी फार जवळून गोळी झाडली आणि गर्दीच्या भागातून गल्ली-गल्लीमधून पळ काढला. ते म्हणाले की हक आणि मंडल पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचे निवासी होते. मात्र अम्फान चक्रीवादळामुळे राज्यात हवाई सेवा बंद असल्याकारणाने त्याचे पार्थिव शरीर घरी पाठवता आले नाही. हक (34) आणि मंडल (29) यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की दोघेजण 37 बटालियनचे होते आणि पंडाक कॅम्पमध्ये तैनात होते. त्यांनी सांगितले की गोळीबाराच्या काही मिनिटांपूर्वी ते रोजा सोडण्यासाठी रोटी घेण्यासाठी गेले होते. मात्र ते इफ्तार करू शकले नाही आणि शहीद झाले. त्यांच्या सहकार्यांनी सांगितले की रोजा असल्याकारणाने त्यांनी सकाळपासून पाण्याचा एक थेंबही घेतला नव्हता. हक यांना पाच वर्षांची मूकबधिर मुलगी आहे. तर मंडल यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि मुलगी आहे.
हे वाचा - मोदींच्या आत्मनिर्भर घोषणेनंतर आता जगभरात या देसी मास्कचा डंका
कोरोना लॉकडाऊनमध्ये चिंता-भीती; अशी घ्या स्वत:ची काळजी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.