Home /News /national /

रडल्या नाही, खंबीरपणे उभ्या; बापाच्या पार्थिवाला सातही लेकींनी दिला खांदा

रडल्या नाही, खंबीरपणे उभ्या; बापाच्या पार्थिवाला सातही लेकींनी दिला खांदा

काळासह हळूहळू का होईना अनेक गोष्टी बदलत असल्याचे दिसून येत आहे. ज्या खूप आश्वासक आहेत.

    बाडमेर, 30 नोव्हेंबर :  एक काळ असा होता जेव्हा महिलांवर अनेक नियम व अटी लादल्या जात होत्या. त्यांच्या वागणुकीवर मर्यादा घातल्या जात होत्या. काही प्रमाणात त्या आजही आहेत. परंतु काळासह हळूहळू का होईना अनेक गोष्टी बदलत असल्याचे दिसून येत आहे. ज्या आश्वासक आहेत. नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात बाडमेर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या सात मुलींनी मुलाप्रमाणे खंबीरपणे उभं राहून त्यांच्या अंत्ययात्रेला खांदा दिला. इतकचं नाही तर त्यांनी वडिलांना मुखाग्नीही दिली. देशात अशी घटना पहिल्यांदा समोर आली की ज्यामध्ये 7 मुलींनी एकत्रित आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. सरहदी बाडमेरमधील महाबार गावाचे माजी सरपंच आणि विश्व विख्यात ब्रम्हधाम आसोतराचे ट्रस्टी हेमसिंह राजपुरोहित यांच निधन जोधपूरमध्ये झालं होतं. त्यांची अंत्ययात्रा महाबार येथून निघाली. त्यांच्या अंत्ययात्रेत सातही मुलींनी सर्व विधी पूर्ण केल्या. हे ही वाचा-एका चुकीमुळे आयुष्य संपलं; ट्रेनवर चढून सेल्फी घेण्यासाठी मोबाइल धरला वर आणि... पुत्रांप्रमाणे कर्तव्य निभावले एकीकडे ग्रामीण भागातसुद्धा मुला-मुलींनी समान वागणूक दिली जात नाही. अशा परिस्थितीत रविवारी, बाडमेरचे महाबार गावाने या बुरसटलेल्या परंपरेला मागे टाकत नवा आदर्श उभा केला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ज्या ज्या विधी मुलगा करतो..त्या सर्व या सातजणींनी केल्या.  मिळालेल्या माहितीनुसार 83 वर्षीय हेमसिंह महाबार यांच्या सात मुली ज्यात- मगू कवर, छगन कवर, तीजो कवर, पूरी कवर, सारी कवर ,घापू कवर, घाई कवर यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. कोरोनामधून ठीक झाल्यानंतर फुप्फुसांच्या संसर्गामुळे मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, हेमसिंह महाबर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर काही दिवसांनी ते यातून बरेही झाले होते. परंतू फुप्फुसांच्या संसर्गामुळे त्यांचे अकाली निधन झाले. बाडमेरचे समाजसेवी आणि महाबारचे माजी सरपंच हमसिंह राजपुरोहित यांच्या निधनानंतर राजस्थानचे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी शोक व्यक्त केला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india, Person death

    पुढील बातम्या