राजकोट, 27 मार्च : गेल्या आठवड्यात राजकोटमधील परदेशी व्यापार कार्यालयाच्या संयुक्त महासंचालक जावरीमल बिश्नोई यांनी त्यांच्याच कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. जावरीमल बिश्नोई यांना सीबीआयने शुक्रवारी ५ लाखांची लाच घेताना पकडलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी सीबीआयचे पथक चौकशीसाठी त्यांच्या कार्यलायत पोहोचली. तेव्हा नाश्त्याची ऑर्डर देण्यात आली होती. अचानक जावरीमल बिश्नोई यांनी सीबीआयच्या पथकासमोर कार्यालयाच्या खिडकीतून उडी मारत आत्महत्या केली. जावरीमल यांच्या कुटुंबियांनी त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.
न्यायालयीन चौकशीचं आश्वासन मिळाल्यानंतर कुटुंबियांनी रविवारी रात्री मृतदेह ताब्यात घेतला. तर सीबीआयने दावा केला की, बिश्नोई यांच्या घरी ९९ लाख रुपये रोकड आढळून आली. तर बिश्नोईंचे कुटुंबिय ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होते तिथे एक सीसीटीव्ही फूटेजही आढळून आलं आहे. यात रोकड असलेली बॅग वरून खाली फेकल्याचं दिसून येतं.
जावरीमल बिश्नोई यांनी एक पॅकेज्ड फूड एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपनीची ५० लाखांची बँक गॅरंटी रिलीज करण्यासाठी ९ लाख रुपयांची लाच मागितली होती. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ६ फाइल्स क्लिअर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती.
हा तर जम्बो किंगचा बाप; तरुणाने तयार केला तब्बल अडीच किलोचा वडापाव!
सीबीआयच्या अधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जावरीमल बिश्नोईला पाच लाख रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतलं होतं. सीबीआय़ नियमानुसार त्यांच्या घरी तपास करत होती. पुढच्याच दिवशी सीबीआयचे पथक बिश्नोई यांच्या कार्यालयात पोहोचलं होतं. तेव्हा त्यांनी नाश्त्याची ऑर्डर दिली होती. अचानक सीबीआयची टीम कार्यालयात आल्याचं पाहताच बिश्नोई यांनी खिडकीतून उडी मारली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गुजरातमधील DGFTअधिकाऱ्याने सीबीआयचे पथक कार्यालयात येताच इमारतीतून उडी मारल्याची घटना घडली होती. यानतंर आता त्याच्या घरातील व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात १ कोटी रुपयांची बॅग घरातून बाहेर फेकल्याचं दिसतंय.#Gujrat #DGFT #CBI pic.twitter.com/LgWvO5SIw9
— News18Lokmat (@News18lokmat) March 27, 2023
कुटुंबियांचा सीबीआयवर गंभीर आरोप
बिश्नोई यांच्यावर अचानक झालेल्या कारवाईनंतर कुटुंबात गोंधळ झाला. कुटुंबाने या कारवाईवर प्रश्न उपस्थित करताना सीबीआयवर गंभीर आरोपही केले आहेत. सीबीआयच्या पथकाने बिश्नोईंविरोधात कट रचल्याचं आणि त्यांना मारल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय. कुटुंबियांनी अधिकाऱ्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला. त्यांनी सिव्हिल रुग्णालयात ठिय्या मांडला. सीबीआय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. रविवारी बिश्नोई यांच्या कुटुंबियांनी डीसीपी सुधीरकुमार देसाई आणि एसीपी पांड्या यांची भेट घेतली. दिवसभर झालेल्या चर्चेनंतर न्यायालयीन चौकशीची मागणी मान्य करण्यात आली. त्यानंतर अखेर कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला.
पत्नीने फेकली पैशांची बॅग
बिश्नोईची पत्नी आणि भाच्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सीबीआयचे पथक तपासासाठी आले तेव्हा बिश्नोईच्या पत्नीने दरवाडा आतून बंद केला होता. त्यानंतर घरात ९९ लाख रुपये आढळल्याचा दावा सीबीआय़ने केला. सीबीआयने म्हटलं की, पैशांनी भरलेली बॅग घराच्या खिडकीतून खाली फेकण्यात आली होती. पत्नीने पैशांनी भरलेली बॅग खाली फेकली होती. यात जवळपास एक कोटी रुपये रोकड मिळाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18