नवी दिल्ली, 16 जून: बुधवारी राजधानीतून एक वेदनादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीतील बदरपूर (Badarpur) भागातील खान सब्जी मंडी (Khan Sabzi Mandi) येथे दिल्ली (Delhi) जल बोर्डाचा टँकर (Water Board Tanker) गर्दीत घुसला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टँकर मालकाला अटक टँकर जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच टँकर मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. लोकांना तुडवत टँकर पुढे गेला अपघाताचा व्हिडिओ 14 जूनचा आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाजारात उपस्थित लोक मोकळेपणाने फिरत आहेत आणि खरेदी करत आहेत. दरम्यान, दिल्ली जल बोर्डाचा पाण्याचा टँकर अनियंत्रितपणे गर्दीत घुसला. लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र बहुतेक लोक या अपघातापासून वाचत नाहीत. टँकरचा वेग खूप आहे.
#WATCH | Five people got injured after they were hit by a Delhi Jal Board tanker in the Khan Sabji Mandi area in Badarpur on June 14
— ANI (@ANI) June 15, 2022
A case u/s 279/337 IPC has been registered. The owner of the tanker has been detained and further investigation is underway: Delhi Police pic.twitter.com/qwR977XSDE
त्यामुळे लोक टँकरखाली येतात. टँकर लोकांना पायदळी तुडवत पुढे जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अपघाताची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी काही जणांना किरकोळ दुखापत झाली. त्याचवेळी पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.