पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क; न्यायालयाचा निर्णय

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क; न्यायालयाचा निर्णय

alimony to wife : पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जून : पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा निर्णय दिल्ली हायकोर्टानं दिला आहे. एका महिलेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. यावेळी न्यायालयानं, कमाईच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित आहे. जर, पतीच्या पगारावर कुणीही अवलंबून नसेल तर, पत्नीला पगाराच्या 30 टक्के हिस्सा मिळाला पाहिजे असं आपल्या निर्णयामध्ये म्हटलं आहे. शिवाय, याचिकेवरील सुनावणी दरम्यान पत्नीला पतीच्या पगाराच्या 30 टक्के रक्कम देण्याचा निर्णय देखील यावेळी न्यायालयानं दिला. 7 मे 2006 रोजी महिलेचं लग्न एका इन्स्पेक्टरशी झालं होतं. त्यानंतर 15 ऑक्टोबर 2006 रोजी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महिलेनं पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. 2008मध्ये महिलेला सर्व प्रथम पोटगी देण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानं पगारातील 30 टक्के हिस्सा पत्नीला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाला पतीनं न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर सुनावणीदरम्यान ही रक्कम 15 टक्के करण्यात आली. त्यानंतर महिलेनं या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिलं. यावर निर्णय देताना न्यायालयानं पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क हसल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले महिलेचे वकील

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पतीच्या पगारावरील महिलेचा हक्क 30 किंवा 15 टक्के करण्यामागे कोणतंही ठोस असं कारण सांगितलं नाही. सुनावणी दरम्यान पतीनं महिलेचा बँक खात्याबद्दल माहिती मागितली. खात्यामध्ये पैसे कुठून आले यावर विचारणा केली. त्यानंतर महिलेनं खर्चासाठी वडिलांकडून पैसे घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर अखेर न्यायालयानं पतीनं पत्नीला पगारातील 30 टक्के हिस्सा देण्याचा आदेश दिला.


VIDEO: अहमदनगरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 12:05 PM IST

ताज्या बातम्या