नवी दिल्ली, 12 जुलै : देशाची राजधानी दिल्लीतील नागरिकांसाठी कोरोना व्हायरस नियंत्रण व सुधारणेच्या स्थितीबाबत महत्त्वाची बातमी आहे. कोरोनाबाबत परिस्थिती सुधारत असताना दिल्लीचे भाजप अध्यक्ष आदर्श कुमार गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोटं क्रेडिट घेण्याची सवय आहेत.
आदर्श गुप्ता म्हणाले की, कोरोना संकटाच्या वेळी केजरीवाल सरकारने दिल्लीची आरोग्य यंत्रणा दुरुस्त करण्याऐवजी दिल्लीतील लोकांना त्याच अवस्थेत सोडले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप केला. याचा परिणाम म्हणून दिल्लीत कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या कमी झाली आणि परिस्थिती सुधारू लागली. पण श्रेय घेण्याच्या शर्यतीत आम आदमी पक्षाचे नेते (आप) आघाडीवर दिसतात.
दिल्ली भाजप अध्यक्ष म्हणाले की, जर क्रेडिट चोरीबद्दलचे आणि जाहिरातीत दिसण्याचा काही किताब असता तर तो अरविंद केजरीवाल यांनाच मिळाला असता.
आदर्श गुप्ता म्हणतात की, दिल्लीत कोरोना संसर्ग रोखण्यात यश येत आहे, ते केवळ आणि केवळ केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतरच शक्य आहे. दिल्ली 24 मार्च ते 14 जून 2020 या काळात कोरोना चाचणी घेण्यात येत नव्हती किंवा लोकांना वेळेवर बेड आणि उपचार मिळत नव्हते.
हे वाचा-गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरमुळे ब्राम्हण समाजात भय - मायावती
खासगी रुग्णालये उपचारांसाठी पाच ते 15 लाख रुपये आकारत होती आणि केजरीवाल सरकार जाहिरातींद्वारे त्याचे मार्केटींग करण्यात व्यस्त होते. 14 जूननंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीची आरोग्य व्यवस्था निश्चित करण्यासाठी कमांड घेतली. ज्यानंतर कोरोना चाचणी दर अर्धा करण्यात आला आणि जलद प्रतिजैविक चाचणी सुरू केली गेली.