नवी दिल्ली, 05 मे : दारूच्या दुकानात सोशल डिस्टंसिंग करण्याचे नियम पाळण्यात अपयशी ठरल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेनं सोमवारी अहवाल तयार केला आणि दुकानांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून दारू विक्रीची वेळ वाढवली. राजधानी दिल्लीत 40 दिवसांनंतर सोमवारी दारूची दुकानं उघडली गेली आणि दुकानाबाहेरचे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करीत नसल्यामुळे दुकानं पुन्हा बंद करावी लागली. यासह, दिल्ली सरकारनंही दारूवर अतिरिक्त 70 टक्के कोरोना साथीचा कर कारण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात येणार आहे.
स्पेशल ब्रँचनं दिली माहिती
विशेष शाखेच्या अहवालात असं म्हटलं आहे की, जास्त गर्दी होऊ नये म्हणून दारू विक्रीचा वेळ वाढवला जाऊ शकतो आणि दुकानांमध्ये दारूचा पुरेसा साठा असावा. कारण लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त मद्य खरेदी करत आहेत. यासाठी विशेष शाखेनं नियम तयार करून ते दिल्ली सरकारला दिले आहेत.
मंगळवारपासून हे काम सरकार करणार आहे
दिल्ली सरकारनं मंगळवारपासून दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना साथीचा कर लादण्याचा निर्णय घेतला असून त्याला 'स्पेशल कोरोना फी' असं नाव देण्यात आलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबवण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळेल. मंगळवारी सकाळपासून हा नियम लागू होईल. त्यामुळे आता मद्यपान करणार्यांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.
केजरीवाल यांचा इशारा
सीएम केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानंतर दिल्लीच्या रेड झोनमध्ये काही अटींसह आर्थिक क्रियाकलापांना सूट दिली होती, परंतु आज ज्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग काही ठिकाणी थट्टा केली गेली आहे, त्यास मान्यता मिळणार नाही. जर पुन्हा असं झालं तर त्या शहरात कारवाई केली जाईल.