जाहिरात
मराठी बातम्या / देश / दिल्लीच्या राजकारणात खळबळ, सीबीआयने केजरीवालांना चौकशीला बोलावंल!

दिल्लीच्या राजकारणात खळबळ, सीबीआयने केजरीवालांना चौकशीला बोलावंल!

अरविंद केजरीवालांना सीबीआयचं समन्स

अरविंद केजरीवालांना सीबीआयचं समन्स

एकीकडे महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असतानाच दिल्लीमध्येहीव खळबळ उडाली आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 एप्रिल : एकीकडे महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असतानाच दिल्लीमध्येहीव खळबळ उडाली आहे. कथित दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून चौकशीला बोलावलं आहे. 16 एप्रिलला सकाळी 11 वाजता केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दिल्लीच्या कथित अवैध दारू घोटाळ्याप्रकरणी आधीच उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे. अबकारी धोरण प्रकरणी मनिष सिसोदिया यांची चौकशी झाली होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

जाहिरात

दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ईडीवर आरोप केले आहेत.अबकारी धोरण प्रकरणी खोटे पुरावे गोळा करून भ्रम तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ईडी लोकांना त्रास देऊन त्यांच्यावर दबाव टाकून खोटी स्टेटमेंट घेत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात