जाहिरात
मराठी बातम्या / देश / CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

CBI च्या FIR मध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1, एकूण 16 जणांची नावं!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia CBI) यांच्या घरावर सीबीआय छापेमारीनंतर आता त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये मनिष सिसोदिया आरोपी नंबर 1 आहेत. यानंतर आयएएस अधिकारी आरव गोपी कृष्ण यांना आरोपी करण्यात आलं आहे. सीबीआयच्या या एफआयआरमध्ये एकूण 16 जणांसोबत एका कंपनीलाही आरोपी करण्यात आलं आहे. मनिष सिसोदिया आणि आयएएस अधिकारी आरव गोपी कृष्ण यांच्या ठिकाणांशिवाय इतर 25 ठिकाणी सीबीआयने शुक्रवारी छापेमारी केली. दिल्ली सरकारने मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आणलेलं अबकारी धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीमधल्या अनियमिततेबद्दल सीबीआयने एफआयआर दाखल केली आहे. सीबीआयच्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर अबकारी धोरण बनवताना आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. तसंच नायब राज्यपालांच्या परवानगीशिवाय दारू उत्पादकांना फायदा पोहोचवणे, दारू विक्रेत्यांचं इएमडी परत करणे आणि L1, L7 लायसन्स देण्याच्या प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप आहे. याचसोबत केन बीयर पॉलिसीमध्येही घोटाळ्याचा आरोप आहे. नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांनी अबकारी निती 2021-22 च्या अंमलबजावणीमधल्या कथित अनियमिततेची चौकशी करावी, अशी शिफारस सीबीआयला केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात