Home /News /national /

मोदी-शहा मॅजिक दाखवणार की केजरीवाल करणार कमाल? काही तासांतच लागणार दिल्लीचा निकाल

मोदी-शहा मॅजिक दाखवणार की केजरीवाल करणार कमाल? काही तासांतच लागणार दिल्लीचा निकाल

या निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही 'न्यूज18 लोकमत वेब'वर जाणून घेऊ शकाल.

    नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Assembly Election Results 2020 )मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. भाजप आणि आम आदमी पार्टीने प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता आहे. या निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स आणि महत्त्वाच्या घडामोडी तुम्ही 'न्यूज18 लोकमत वेब'वर जाणून घेऊ शकाल. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपमध्ये जोरदार घमासान सुरू होतं. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची देशभरात उत्सुकता आहे. मतदान पूर्ण झाल्यानंतर आलेल्या काही संस्थांच्या एक्झिट पोल्सने दिल्लीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आपचं सरकार स्थापन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 पैकी आम आदमी पार्टीला 49 ते 63 जागा, भाजपला 5 ते 19 जागा तर काँग्रेसला 0 ते 4 जागा मिळतील, असा अंदाज एबीपी आणि सी व्होटरचा एक्झिट पोल सांगतो. 'टाइम्स नाऊ'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत 'आप'ला 44 जागा तर भाजप 26 जागा मिळतील, मात्र काँग्रेसला भोपळा फोडता येणार नाही. 'रिपब्लिक'च्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत कोण मारणार बाजी? AAP : 48-61 BJP : 9-21 CONG : 0-1 Newsx- Neta चा एक्झिट पोल काय सांगतो? AAP: 50-56 BJP: 10-14 Congress: 0 2015 साली झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने भाजप आणि काँग्रेसचा अक्षरश: धुव्वा उडवला होता. या निवडणुकीत 'आप'ला दिल्लीत 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजपच्या खात्यात अवघ्या 3 जागा जमा झाल्या, तर कधीकाळी दिल्लीत निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. मागील निवडणुकीत कोणते मुद्दे ठरले प्रभावी? अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचं अल्पमतातील सरकार कोसळून दिल्लीत 2015 साली पुन्हा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत केजरीवालांचीच जादू दिसून आली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकणाऱ्या भाजपला काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. नरेंद्र मोदी यांचं लोकप्रियतेच्या वादळाची दिल्लीच्या मैदानात मात्र अरविंद केजरीवालांनी हवा काढून टाकली. पाणी, वीज, रस्ते, शिक्षण अशा मुद्द्यांवरून केजरीवाल यांनी दिलेल्या आश्वासनांवर दिल्लीच्या जनतेनं विश्वास टाकला. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसला मोठ्या पराभवाचं तोंड पाहावं लागलं. शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार कोणत्या मुद्द्यांना महत्त्व देतात आणि कुणाच्या पारड्यात मत टाकतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Delhi assembly election, Narendra modi

    पुढील बातम्या