Delhi Election Result Live : केजरीवाल यांच्या फक्त या एका रणनीतीमुळे दिल्लीत बलाढ्य भाजपवर केली मात

Delhi Election Result Live : केजरीवाल यांच्या फक्त या एका रणनीतीमुळे दिल्लीत बलाढ्य भाजपवर केली मात

केजरीवाल यांनी अत्यंत हुशारीने भाजपकडून टाकला जाणारा प्रत्येक डाव प्रभावहीन केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत विजयाची हॅट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार दिल्लीतील विधानसभेच्या 70 जागांपैकी आम आदमी पार्टी (AAP) 58 आणि भाजप (BJP) 12 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.

अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण ताकद पणाला लावलेल्या भाजपला देशाच्या राजधानीत कसं रोखलं, याची चर्चा देशभर आहे. अरविंद केजरीवाल यांनी अत्यंत हुशारीने आपली सर्व निवडणूक यंत्रणा हाताळली. तसंच भाजपकडून टाकला जाणारा प्रत्येक डाव प्रभावहीन केला.

अरविंद केजरीवाल यांचा मास्टरस्ट्रोक

दिल्लीची विधानसभा निवडणूकही नरेंद्र मोदी Vs अरविंद केजरीवाल अशी व्हावाी, यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात आला. कारण ज्या निवडणुका मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या जातात, तिथं भाजपला फायदा होतो, असं एकंदरित चित्र आहे. मात्र भाजपची ही खेळी केजरीवालांनी हाणून पाडली. अरविंद केजरीवाल यांनी थेट मोदींवर टीका करण्याचं टाळलं आणि हाच मुद्दा आपसाठी गेमचेंजर ठरला.

आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीमनेही मोदींना लक्ष्य न करता दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावरच फोकस केला. त्यामुळे दिल्लीत केजरीवाल नाही तर कोण? असा सवाल 'आप'कडून उपस्थित करण्यात आला. त्यामुळे थेट केजरीवाल आणि मनोज तिवारी यांच्यात तुलना करण्यात आली. या सामन्यात केजरीवाल उजवे ठरले आणि आपने पुन्हा विजय खेचून आणला.

केजरीवाल यांनी इतर राजकीय पक्षांकडून होणारी अजून एक चूक टाळल्याचं पाहायला मिळालं. ती म्हणजे केजरीवाल यांनी भाजपच्या पीचवर खेळण्याचं नाकारलं. भाजप मुद्दे उपस्थित करणार, आरोप करणार आणि त्यानंतर विरोधक स्वत:ला डिफेन्ड करत राहणार, हे गेल्या काही निवडणुकांतील समीकरण झालं आहे. केजरीवाल यांनी मात्र दिल्लीची निवडणूक दिल्लीच्याच प्रश्नांवर झाली पाहिजे, हे आग्रहाने आणि आक्रमकपणे मांडलं. परिणामी निवडणुकीत कलम 370, शाहीनबाग हे मुद्दे प्रभावी ठरले नाहीत.

First published: February 11, 2020, 2:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या