• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Rajnath Singh Announcement: भारताचं डिफेन्सही होणार आत्मनिर्भर! संरक्षण सामुग्रीसाठी 52 हजार कोटींची गुंतवणूक, राजनाथ सिंह यांनी केली घोषणा

Rajnath Singh Announcement: भारताचं डिफेन्सही होणार आत्मनिर्भर! संरक्षण सामुग्रीसाठी 52 हजार कोटींची गुंतवणूक, राजनाथ सिंह यांनी केली घोषणा

संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 101 संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 ऑगस्ट: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने पहिले पाऊल टाकले आहे. यासाठी संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 101 संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. एवढेच नाही तर संरक्षण सामुग्रीसाठी 52 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचेही यावेळी राजनाथ सिंह यांनी सांगितले. राजनाथ सिंह असेही म्हणाले की, 'या आवाहनाची दखल घेत संरक्षण मंत्रालयाने 101 वस्तूची यादी तयार केली आहे ज्यांच्या निर्यातीवर बंदी घातली जाईल. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे जाण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. संरक्षणमंत्री म्हणाले की, 'भारतीय संरक्षण उद्योगाला स्वत: च्या डिझाइन आणि विकास क्षमतांचा वापर करून किंवा डीआरडीओने तयार केलेल्या तंत्रांचा अवलंब करुन सैन्य दलाच्या गरजा भागवण्यासाठी या वस्तू तयार करण्याची ही मोठी संधी आहे.' राजनाथ सिंह म्हणाले की, सशस्त्र सेना, सार्वजनिक आणि खाजगी उद्योगांसह सर्व संबंधितांशी झालेल्या चर्चेनंतर 101 उत्पादनांची यादी तयार केली गेली आहे. भविष्यात दारूगोळा आणि संरक्षण उत्पादने तयार करण्याच्या भारतीय उद्योगाची क्षमता वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या मते, एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2020 दरम्यान अशा सेवांच्या सुमारे 260 योजनांचा अंदाजे 3.5 लाख कोटींचा करार या तिन्ही दलांनी केला होता. आता पुढील 6 ते 7 वर्षांत देशांतर्गत उद्योगांना 4 लाख कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळेल असा अंदाज वर्तविला जात आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर या निर्णयाची घोषणा करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र आणि मागणी या पाच आधारस्तंभांच्या आधारावर आत्मनिर्भर भारताचे आवाहन केले आहे. यासाठी खास आर्थिक पॅकेज जाहीर केले.
  Published by:Priyanka Gawde
  First published: