जाहिरात
मराठी बातम्या / देश / एेतिहासिक लाल किल्ला दिल्लीतील कंपनीने घेतला दत्तक !

एेतिहासिक लाल किल्ला दिल्लीतील कंपनीने घेतला दत्तक !

एेतिहासिक लाल किल्ला दिल्लीतील कंपनीने घेतला दत्तक !

केंद्र सरकारच्या अडॉप्ट द हेरिटेज या योजनेअंतर्गत तब्बल 25 कोटींमध्ये डालमिया ग्रुपनं युनेस्को जागतिक वारसा असलेलं हे स्थळ संवर्धनासाठी दत्तक घेतलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 28 एप्रिल : लाल किल्ला दत्तक घेण्यावरून नवा वाद सुरू झालाय.  दिल्लीतील एका प्रमुख कॉर्पोरेट हाऊस दालमिया ग्रुपनं लाल किल्ला दत्तक घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. केंद्र सरकारच्या अडॉप्ट द हेरिटेज या योजनेतंर्गत तब्बल 25 कोटींमध्ये डालमिया ग्रुपनं लाल किल्ला दत्तक घेतलाय. केंद्र सरकारच्या अडॉप्ट द हेरिटेज या योजनेअंतर्गत तब्बल 25 कोटींमध्ये डालमिया ग्रुपनं युनेस्को जागतिक वारसा असलेलं हे स्थळ संवर्धनासाठी दत्तक घेतलं आहे. 23 मे पासून डालमिया ग्रुप या किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचीही माहिती आहे. दरम्यान, 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी काही काळ हे संवर्धनाचं काम बंद राहिल. मात्र नंतर पुन्हा एकदा हे काम सुरू होईल. असं असलं तरी जागतिक वारसा असलेली ठिकाणी अशी दत्तक देता येतात का यावरून वाद सुरू झालाय. डालमिया भारत ग्रुप,पर्यटन मंत्रालय आणि आर्किऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या यांच्यामधे लालकिल्ल्याच्या संवर्धनासाठीचं कंत्राट 9 एप्रिल रोजी ठरलं आणि कंत्राटाप्रमाणे 6 महिन्याच्या कालावधीत डालमिया ग्रुप लालकिलल्याचं संवर्धन आणि किल्ल्यामधे आवश्यक त्या सुविधा पुरवण्याचं काम करणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: delhi , red fort
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात