जाहिरात
मराठी बातम्या / देश / Cyclone Biparjoy : अंतराळातून दिसलं 'बिपरजॉय'चं भयान रूप; NASA कडून वादळाचे फोटो प्रसिद्ध; 1 लाख लोकांचे स्थलांतर

Cyclone Biparjoy : अंतराळातून दिसलं 'बिपरजॉय'चं भयान रूप; NASA कडून वादळाचे फोटो प्रसिद्ध; 1 लाख लोकांचे स्थलांतर

'बिपरजॉय'चं भयान रूप

'बिपरजॉय'चं भयान रूप

Nasa Biparjoy cyclone picture from Space : बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमध्ये भारतीय किनारपट्टीवर धडकणार आहे. या भागातून एक लाख लोकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम हाय अलर्टवर आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 15 जून : अरबी समुद्रात तळ ठोकलेले बिपरजॉय चक्रीवादळ आज संध्याकाळी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. वादळापूर्वीच किनारपट्टी भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. सोसाट्याचा वारा सुटला आहे. आज संध्याकाळपर्यंत तो ताशी 150 किलोमीटरचा वेग गाठू शकेल, असा अंदाज आहे. दरम्यान, अमेरिकेच्या स्पेस एजन्सी नासाने बिपरजॉयबद्दल एक छायाचित्रही शेअर केले आहे. हा फोटो अंतराळातून घेण्यात आला आहे. ज्याचे मूळ लक्ष भारतातील गुजरातजवळील अरबी समुद्रावर आहे. नासाने प्रसिद्ध केलेला फोटो पाहून वादळ किती भयंकर आहे, याची प्रचिती येत आहे. Biparjoy NASA Picture नासाच्या अर्थ वेधशाळेने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये समुद्राच्या जागी पांढर्‍या वादळाचे मोठे वर्तुळ दिसत आहे. जे या भागात पूर्णपणे पसरलेले आहे. वादळ किती मोठे आणि रौद्र आहे हे सांगण्यासाठी हे छायाचित्र पुरेसे आहे. जेव्हा ते भारतीय किनार्‍यावर आदळेल, तेव्हा ते किती विनाश घडवू शकते. वृत्तानुसार, या वादळाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुजरातमधील प्रशासनाने गुरुवारी सकाळपर्यंत सुमारे एक लाख लोकांना किनारी भागातून बाहेर काढले आहे. वाचा - देशातली अशी नदी, जिथे दर दिवसाला एका माणसाचा होतो बुडून मृत्यू, धक्कादायक आकडेवारी! एनडीआरएफचे लक्ष गुजरात-महाराष्ट्रावर किनारपट्टीचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. सध्या अरबी समुद्राच्या या भागात कोणतेही समुद्री जहाज नाही. मच्छिमारांना या परिसरातून आधीच बाहेर काढण्यात आले होते. 10 जूनपासून किनारी भाग रिकामा करण्याचे काम सुरू आहे. भारतीय रेल्वेनेही या भागातून जाणाऱ्या सुमारे 100 गाड्या रद्द केल्या आहेत. NDRF चे मुख्य लक्ष गुजरात व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रातील किनारी भागावर आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वादळ सर्वप्रथम गुजरातच्या या किनारपट्टीवर धडकणार बिपरजॉय वादळ आज संध्याकाळी गुजरातमधील जखो बंदरावर धडकू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. या भागात ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. गुजरात सरकारने आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना या भागातून हटवून सुरक्षित स्थळी पाठवले आहे, असे सांगण्यात आले आहे. यापुढेही हे काम सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cyclone
  • First Published :
जाहिरात
जाहिरात