नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : देशातील तीन राज्यांमध्ये पुढील 24 ते 48 तासांत (cyclone alert in 3 states of India in next 24 hours) चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्यानं (IMD issues alert for West Bengal, Andhra Pradesh and Odisha) जारी केलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या काही भागात या वादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. पुढील 12 तासात या वादळाचा जोर वाढण्याची शक्यता असून सोमवारनंतर त्याचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विध्वंसक ‘गुलाब’
हवामान खात्यानं या वादळाला गुलाब असं नाव दिलं आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे चक्रीवादळ सक्रीय राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.आंध्रप्रदेशातील उत्तरेचा भाग आणि ओडिशातील दक्षिणेचा भाग यांना या वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’
पुढील काही तासात वादळाचा वेग वाढणार असल्याने हवामान खात्याने आंध्रप्रदेश आणि ओडिशात यलो अलर्ट जारी केला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत कलिंगपट्टनम भागात यामुळे जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हे वाचा - ठरलं! असं असेल पंजाबचं नवं मंत्रिमंडळ, 'या' नेत्यांना डच्चू
बंगामध्ये जोरदार पावसाचा अंदाज
पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं असून हावडा, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, मिदनापूर या भागात वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. या वादळाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी युनिफाईड कमांड सेंटर नावाने एक कंट्रोल रुम सुरु करण्यात आली आहे. सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट देण्यात आला असून आपत्तीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आवश्यकता नसताना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्रकिनारी सुरक्षा वाढवण्यात आली असून पर्यटकांना किनाऱ्यापासून सुरक्षित अंतरावर थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Cyclone, Odisha, West bangal