मराठी बातम्या /बातम्या /देश /

धक्कादायक! CRPF जवानानं स्वतःवर झाडली गोळी, 18 तासांपासून पत्नी अन् मुलीला ठेवलं होतं डांबून

धक्कादायक! CRPF जवानानं स्वतःवर झाडली गोळी, 18 तासांपासून पत्नी अन् मुलीला ठेवलं होतं डांबून

धक्कादायक! CRPF जवानानं स्वतःवर झाडली गोळी, 18 तासांपासून पत्नी-मुलीला ठेवलं होतं डांबून

धक्कादायक! CRPF जवानानं स्वतःवर झाडली गोळी, 18 तासांपासून पत्नी-मुलीला ठेवलं होतं डांबून

CRPF Soldier holds wife and daughter hostage: जोधपूरमधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात एका जवानानं रविवारी संध्याकाळी 5 वाजता पत्नी अन् मुलीसह स्वतःला घराच्या खोलीत डांबून घेतलं होतं. यावेळी त्यानं अनेकदा हवेत फायरींग देखील केलं होतं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 जुलै: राजस्थानमधील जोधपूर शहरातील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात (CRPF Soldier holds wife and daughter hostage) कुटुंबासह स्वत:ला डांबून ठेवलेल्या जवानानं स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे. पोलिस आयुक्त रवीदुट गौर यांनी याची पुष्टी केली आहे. गेल्या 18 तासांपासून या जवानानं आपल्या पत्नीला आणि 8 महिन्यांच्या मुलीला एका खोलीत ओलीस ठेवलं होतं. याशिवाय तो बाल्कनीत येऊन त्याच्याकडील रायफलच्या माध्यमातून वारंवार हवेत गोळीबार करत होता. जोधपूरस्थित CRPF ट्रेनिंग सेंटरमध्ये 3 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या राजोला काला येथील रहिवासी जवान नरेश जाट याने रविवारी संध्याकाळी 5 वाजता सरकारी क्वार्टर रूममध्ये स्वत: ला डांबून घेतलं होते. यानंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये एकच गोंधळ उडाला होता. यादरम्यान जवानानं आपला कुणावरही विश्वास नसल्याचं सांगत बोलणं टाळलं. त्यानं फक्त सीआरफीएफ आयजींशी बोलणार असल्याचं सांगितलं, त्यानंतर आयजी विक्रम सहगल तातडीने जोधपूरला पोहोचले, परंतु त्यापूर्वीच त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली. नेमकं काय झालं? जोधपूरस्थित CRPF ट्रेनिंग सेंटरमध्ये ३ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या राजोला काला येथील रहिवासी जवान नरेश जाट याने रविवारी संध्याकाळी 5 वाजता सरकारी क्वार्टर रूममध्ये स्वत: ला डांबून घेतलं होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रविदत्त गौर आणि इतर अधिकारीही सीआरपीएफ केंद्रात पोहोचले होते. तो रायफल घेऊन पुन्हा पुन्हा बाल्कनीत येत आहे. सीआरपीएफचे अधिकारीही घटनास्थळी हजर होते. जवानाच्या कुटुंबीयांनाही बोलवण्यात आलं होतं. त्याच्या वडिलांनीही त्याला फोनवर समजावून सांगितलं. पण तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. सीआरपीएफ कॅम्पमध्ये उडाला गोंधळ- पोलिसांनी सांगितलं की, पाली जिल्ह्यातील राजोला काला येथील रहिवासी नरेश जाट, हा सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात 3 वर्षांपासून तैनात होता. त्याने रविवारी संध्याकाळी 5:00 वाजता पहिल्यांदा हवेत गोळीबार केला. या घटनेनंतर सीआरपीएफ कॅम्पमध्ये गोंधळ उडाला. अधिकाऱ्यांनी त्याला समजावून सांगायचा प्रयत्न केला, परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दारूच्या नशेतील या जवानानं आपल्या पत्नी आणि मुलालाही घरात डांबून ठेवलं होतं. या घटनेनंतर त्याचे वडील आणि भावाला पाली जिल्ह्यातून बोलावण्यात आलं. वडील  त्याच्याशी फोनवर बोलले, परंतु तो शांत झाला नाही. हेही वाचा: JEE Mains Result 2022: JEE Mains चा निकाल जाहीर; स्कोर कार्ड डाउनलोड करण्यासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स या घटनेनंतर जवानाच्या घराभोवती पोलिस अधिकारी तैनात आहेत. पाली येथील वाहतूक पोलिसात कार्यरत असलेल्या नरेशच्या भावानं पोलिसांना सांगितलं की, सुमारे 7-8 महिन्यांपूर्वी त्याचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्याचा स्वतःवरील संयम सुटतो. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी जवानाला समजवायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याचे वडील आणि नातेवाईकांनाही तिथे बोलावण्यात आले होतं. जवानाकडे होती इन्सास रायफल- जवान नरेश याच्या वडीलांनी त्याच्याशी फोनवरून बोलण्याचा व त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तो  सतत एकच वाक्य बोलत आहे की मी स्वतः मरेन आणि सगळ्यांना मारेन. त्याचा एक भाऊ जोधपूर एम्समध्ये डॉक्टर आहे. सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की जवान नरेश याच्याकडे इन्सास रायफल आहे. त्याच्याकडे दोन मॅगझिनही होत्या. एका मध्ये 20 राऊंड असतात. म्हणजेच त्याच्याकडे एकूण 40 राऊंड आहेत. त्यापैकी त्याने आतापर्यंत 8 फायर केले आहेत. सध्या घटनास्थळी परिस्थिती पाहून सीआरपीएफ अधिकारी आणि पोलीस अधिकारी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यानं सांगितलं की माझा कोणत्याही अधिकाऱ्यावर विश्वास नाही, मी फक्त सीआरपीएफच्या आयजींशी बोलेन. त्यानंतर आयजी विक्रम सहगल तातडीने जोधपूरला पोहोचले, परंतु त्यापूर्वीच त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: CRPF, Hostage

    पुढील बातम्या