नवी दिल्ली 14 जुलै: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. दररोज काही हजारांमध्ये नव्या रुग्णांची भर पडत आहे. अशी परिस्थिती असतानाही काही गोष्टी भारतासाठी दिलासादायक आहेत असा दावा ICMRने केला आहे. संस्थेचे संचालक बलराम भार्गव (Balram Bhargava DG ICMR) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. भार्गव यांनी जगातल्या इतर देशांशी तुलना करताना तीन मोठ्या गोष्टी सांगितल्या. या गोष्टी भारतासाठी दिलासा देणाऱ्या आहेत. भार्गव म्हणाले, भारतात आता चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या यात वाढ होत असली तरी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही. केंद्र आणि सर्व राज्य सरकारे मिळून प्रयत्न करत असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक 10 लाख चाचण्या केल्यानंर भारतात 657 नवे रुग्ण आढळतात. तर इतर देशांमध्ये हे प्रमाण 14 टक्के जास्त आहे. भारतात 10 लाख लोकांमागे मृत्यूचा दर हा 17.2 असून इतर देशांमध्ये 35 टक्के जास्त आहे. देशात रुग्णवाढीचा दर कमी होत असून 31.28 टक्क्यांवरून तो दर 12 जुलैरोजी 3.24 टक्क्यांवर आला असा दावाही त्यांनी केला आहे. वाढणारा आलेख आता कमी होत आहे ही दिलासा देणारी बाब असल्याचंही भार्गव यांनी स्पष्ट केलं.
There are 2 Indian indigenous candidate vaccines. They have undergone successful toxicity studies in rats, mice and rabbits. Data was submitted to DCGI following which both these got clearance to start early phase human trials early this month: Balram Bhargava, DG-ICMR. #COVID19 pic.twitter.com/7O5ib2bVuA
— ANI (@ANI) July 14, 2020
सध्या नवीन आढळणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त आहे. मे महिन्यामध्ये हे प्रमाण उलट होतं अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मे महिन्यांमध्ये 26 टक्के असलेले रुग्ण बरे होण्याचा दर हा आता 63 टक्क्यांवर पोहोचल्याची माहितीही देण्यात आली आहे.
देशातल्या एकूण रुग्णसंख्येपैकी 50 टक्के रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रा आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये आहे. देशात सध्या 311565 Active रुग्ण असून आत्तापर्यंत 571459 लाख रुग्ण बरे झाले आहेत.