LIVE NOW

LIVE : नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, भाजप नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

Lokmat.news18.com | April 19, 2021, 8:10 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 19, 2021
auto-refresh

Highlights

8:10 pm (IST)

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक
राज्यात दिवसभरात 58 हजार 924 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 52 हजार 412 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 351 कोरोना रुग्णांचा मृत्यू
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 81.04, मृत्युदर 1.56%
राज्यात सध्या 6 लाख 76,520 अॅक्टिव्ह रुग्ण

 

कोरोना संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा
मुंबईत रुग्ण बरं होण्याच्या प्रमाणात वाढ
कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 47 दिवस
मुंबईत दिवसभरात 7381 नवे रुग्ण
मुंबईत दिवसभरात 8583 कोरोनामुक्त
मुंबईत दिवसभरात 57 रुग्णांचा मृत्यू

7:41 pm (IST)

1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण
लसीकरणाबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा
18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस
वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी मोठा निर्णय
'लस उत्पादकांनी 50 टक्के साठा राज्याला द्यावा' 

7:03 pm (IST)

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली लस
जे.जे. रुग्णालयात घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस
आरोग्यमंत्र्यांनी परिचारिका, डॉक्टरांचे मानले आभार
45 वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी - आरोग्यमंत्री
'कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण आवश्यक'
'आतापर्यंत सुमारे 1 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना लस'
लसीकरणात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी -राजेश टोपे
'18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांचंही लसीकरण करावं'
आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून मागणीचा पुनरुच्चार

6:51 pm (IST)

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना कोरोना
कोरोनाची लागण झाल्यानं 'एम्स'मध्ये उपचार सुरू 

5:51 pm (IST)

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे LIVE
कोरोनाची दुसरी लाट अधिक गंभीर - नगराळे
सर्व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत - नगराळे
निर्बंधाचा नागरिकांना त्रास नाही - हेमंत नगराळे
विनाकारण फिरणाऱ्यांमुळे मनस्ताप - नगराळे
अत्यावश्यक वाहनांसाठी कलर कोड - नगराळे
लोकांनी विनाकारण बाहेर पडणं टाळावं - नगराळे
'गैरफायदा घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार'
निर्बंधांना जनतेनं सहकार्य करावं - हेमंत नगराळे
स्वयंस्फूर्तीनं नियमांचं पालन करावं - नगराळे
पोलिसांचं 70 टक्के लसीकरण पूर्ण - नगराळे
शारीरिक शिक्षा देणं योग्य नाही - हेमंत नगराळे 

5:48 pm (IST)

मुंबईकरांसाठी आताची सर्वात मोठी बातमी
'मुंबईत कोरोनाची दुसरी लाट सध्या स्थिर'
'गेल्या आठवड्यात मुंबईत रुग्णसंख्या कमी'
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय?
'ऑक्सिजन पुरवठा लवकरच सुरळीत होईल'
'सर्वच रुग्णांना बेडची गरज नसते'
'कुणाला बेडची गरज हे डॉक्टर सांगणार'
मनपाचे अतिरिक्त आयुक्त काकाणींची माहिती 

4:58 pm (IST)

राज्यात कडक निर्बंध आवश्यक -आरोग्यमंत्री
'30 एप्रिलपर्यंत कडक लॉकडाऊन गरजेचा'
नियमांचं पालन काटेकोरपणे झालं पाहिजे -टोपे
'किराणा, भाजीपाल्यासाठी फिरणं कमी व्हावं'
'संचारबंदीचे नियम आणखी कडक केले पाहिजे'
विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई व्हावी -टोपे
गर्दी कमी व्हावी, हा आमचा उद्देश -राजेश टोपे
'दुर्गम भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्क राहावं'
ऑक्सिजन तुटवड्यावर मार्ग काढतोय -राजेश टोपे
300 मेट्रिक टन ऑक्सिजन बाहेरून आणतोय -टोपे
हवेतून ऑक्सिजन मिळवण्याचा प्रयत्न -राजेश टोपे
'बाहेरून जादा ऑक्सिजन पुरवठा मिळणं कठीण'
'रेमडेसिवीर'चा पुरवठा सुरळीत होईल -राजेश टोपे
आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवतोय -राजेश टोपे
'मार्ड'च्या जागा भरण्याबाबत निर्णय घेऊ -टोपे
डॉक्टरांनी सहकार्य करणं गरजेचं -राजेश टोपे 

3:37 pm (IST)

नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे स्थिती घातक -ऊर्जामंत्री
'ऑक्सिजनचा तुटवडा झाल्यानं नागपुरात हाहाकार'
लॉयड स्टीलकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन -ऊर्जामंत्री
'स्टील प्लांटच्या बाजूला 1000 बेडचं रुग्णालय उभारू'
'लॉयडमधून ऑक्सिजन आणू शकत नाही म्हणून निर्णय'
'कोराडी, खापरखेडा प्रकल्पात ऑक्सिजनचं उत्पादन'
'कॉम्प्रेसर लावल्यास रोज 1 हजार सिलिंडर उत्पादन'
ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची माहिती
'आज 4 टँकरमध्ये 82 मेट्रिक टन ऑक्सिजन आलंय'
हिंगणा परिसरात ऑक्सिजन प्लांट उभारतोय -ऊर्जामंत्री
'मानकापूर संकुलात जम्बो कोव्हिड सेंटर सुरू करणार'

 

3:19 pm (IST)

#BREAKING

-कोरोना व्हायरसमुळे भारतात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला नियोजित भारत दौरा पुढे ढकलला आहे. पुढील आठवड्यात हा दौरा होणार होता. मात्र भारतातील कोरोनाची स्थिती पाहता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

3:17 pm (IST)

देशातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बैठक 
पंतप्रधान मोदी दुपारी 4.30 वा. संवाद साधणार
देशातील आघाडीच्या डॉक्टरांशी व्हीसीद्वारे संवाद
संध्याकाळी 6.30 वा. फार्मा कंपन्यांसोबत चर्चा 

Load More
कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स