जाहिरात
मराठी बातम्या / देश / Coronavirus Cases in India: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता; लवकरच देशभरात मॉक ड्रिल होणार

Coronavirus Cases in India: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता; लवकरच देशभरात मॉक ड्रिल होणार

चीनमध्ये कोरोनाचा कहर!

चीनमध्ये कोरोनाचा कहर!

Coronavirus XBB1.16 Variant Cases in India: केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी सांगितले की, लवकरच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी एक मॉक ड्रिल आयोजित केली जाईल.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 23 मार्च : जवळपास दोन वर्ष जगास वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाव्हायरस ‘एक्सबीबी 1.16’ च्या नवीन व्हेरिएंटची 349 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरोना संक्रमित रुग्णांची अचानक वाढ होण्यामागे हा नवीन प्रकार असल्याचे मानले जात आहे. ही माहिती ‘इंडियन SARS-Cov-2 Genomics Consortium’ (INSACOG) च्या डेटावरून प्राप्त झाली आहे. आकडेवारीनुसार, नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नमुन्यांच्या तपासणीत नवीन प्रकारची 349 प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी महाराष्ट्र (105), तेलंगणा (93), कर्नाटक (61) आणि गुजरात (54) या राज्यात सर्वाधिक प्रकरणे आढळून आली आहेत. इन्साकॉगच्या डेटानुसार, जानेवारीमध्ये दोन नमुन्यांमध्ये नवीन प्रकार ‘XBB 1.16’ असल्याचे स्पष्ट झाले. फेब्रुवारीमध्ये या प्रकारच्या 140 प्रकरणांची नोंद झाली, तर मार्चमध्ये आतापर्यंत 207 नमुन्यांमध्ये ‘XBB 1.16’ ची पुष्टी झाली आहे. अलीकडे देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. देशात मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात येणार गेल्या काही आठवड्यांमध्ये देशात इन्फ्लूएंझा प्रकरणांमध्ये वाढ आणि कोविड-19 संक्रमितांमध्ये वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी सांगितले की, लवकरच सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी एक मॉक ड्रिल आयोजित केली जाईल जेणेकरून लोकांना दोन्ही प्रकारच्या धोक्यांबद्दल सांगता येईल. यापूर्वी 27 डिसेंबर रोजी देशभरातील रुग्णालयांमध्ये कोविड संदर्भात त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आली होती. सध्या जागतिक प्रकरणांपैकी 1% प्रकरणे भारतात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिली आहे. वाचा - तुपाचे काही थेंब तुमच्या त्वचेवर करतील जादू, स्किन केअर रुटीनमध्ये असा करा वापर या आठ राज्यांमध्ये सर्वाधिक प्रकरणे अहवालानुसार, सध्या महाराष्ट्र, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान ही आठ राज्ये आहेत जिथे कोविड -19 चे सर्वाधिक रुग्ण आहेत. भारतात एका दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची 1,300 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत एकूण संक्रमित लोकांची संख्या 4,46,99,418 झाली आहे. त्याचवेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 7,605 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एका दिवसात नवीन प्रकरणांची ही संख्या गेल्या 140 दिवसांतील सर्वाधिक आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रात संसर्गामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर देशातील मृतांची संख्या 5,30,816 झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात