Home /News /national /

भारतातील कोरोना रुग्णांनी पार केला 3 लाखाचा टप्पा, पुन्हा रेकॉर्डब्रेक वाढ

भारतातील कोरोना रुग्णांनी पार केला 3 लाखाचा टप्पा, पुन्हा रेकॉर्डब्रेक वाढ

त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.

त्याआधी, युरोपियन सेंट्रल बँकेच्या प्रमुख क्रिस्टीन लगार्डे यांनी शुक्रवारी सांगितलं की, 1918-19 च्या स्पॅनिश फ्लूपासून खूप काही शिकलो आहे आणि तशीच कोरोनाची दुसरी लाट नक्कीच भयानक असणार आहे.

गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक 11458 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 13 मे : देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला असून भारतात आतापर्यंत एकूण 3,08,993 जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 8 हजार 884 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासामध्ये सर्वाधिक 11458 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. भारतात मागील 24 तासांमध्ये 386 लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. एकीकडे ही काळजी वाढवणारी आकडेवारी समोर येत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने काहीसा दिलासा मिळाला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 49.94 टक्के इतका असून आतापर्यंत देशभरात 1,54,330 बरे झाले आहेत. दरम्यान, भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर गेल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात असताना श्री गंगाराम रुग्णालयाचे डॉक्टर एस पी ब्योत्रा यांनी मात्र कोरोनाचा फैलाव सध्याच्या घडीला कमी होण्याची सध्या कोणतीही चिन्हं नसल्याचं म्हटलं आहे. जुलै महिन्याच्या मध्यात किंवा ऑगस्ट महिन्यात अखेरीस कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसंच कोरोनावरील लस पुढील वर्षीच्या तिमाहीपर्यंत सापडेल असं वाटत नाही,असे देखील त्यांनी म्हटलं आहे. शिथील होत असलेले लॉकडाउनचे निर्बंध, रुग्णसंख्येतील रोजची वाढ; मात्र मृत्युदरातील घट अशा सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात देशभरातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील, अशी शक्यता आहे. राज्यांची गटवारी करून 16 व 17 जून असे दोन दिवस हा संवाद चालण्याची शक्यता आहे. लॉकडाउन लागू करणे व पुढे तो शिथील करणे अशा काळातील पंतप्रधानांची ही चर्चेची सहावी फेरी ठरेल. बदललेल्या परिस्थितीत या संवादादरम्यान काय चर्चा होते व कुठले नवीन निर्णय घेतले जातात, ते महत्त्वाचं ठरणार आहे. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus

पुढील बातम्या