नवी दिल्ली, 01 एप्रिल : कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) लढण्यासाठी आता भारतीय लष्कर सज्ज झालं आहे. तिन्ही दलाच्या सेनेनं कोणतीही कसर सोडली नाही. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि रुग्णालयाची तयारी झालेली आहे. फक्त एका इशाऱ्यावर तिन्ही दलाचे जवान उपचारांसाठी झटणार आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्समार्फत सध्य परिस्थिती केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आणि तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी वेंटिलेटर, मास्क, सॅनिटायझर आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूचं उत्पादन दुप्पट करण्याचे निर्देश संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेत.
आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसचे डीजी लेफ्टनंट जनरल अनुप बॅनर्जी यांनी संरक्षणमंत्र्यांना माहिती देताना सांगितलं की, “सध्याची परिस्थिती पाहता आवश्यक औषधं आणि मशीन्स खरेदी करण्यात आल्यात. शिवाय रुग्णालयातही पाठवण्यात आलेत. तसंच सेनेतील निवृत्त डॉक्टरांनाही वॉलेंटियर सर्व्हिससाठी तयार राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे” नेव्ही चीफ अॅडमिरल करमबीर सिंह यांनी सांगितलं की, “आपल्या देशासह शेजारील देशांच्या मदतीसाठी आम्ही तयार आहोत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचे जहाज तैनात आहेत” तर चीफ ऑफ डिफेन्सचे स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी रुग्णालयंही सज्ज आहेत, यामध्ये 9000 बेड तयार आहेत, अशी माहिती दिली. हे वाचा - निजामुद्दीन परिषदेमुळे धोका वाढला, मरकझशी संबंधित 150 पेक्षा अधिक जणांना कोरोना