Home /News /national /

केंद्राचा नवा Alert: कोरोनाबाधित रुग्णापासून हवेत 10 मीटरपर्यंत जावू शकतो विषाणू, अशी घ्या काळजी

केंद्राचा नवा Alert: कोरोनाबाधित रुग्णापासून हवेत 10 मीटरपर्यंत जावू शकतो विषाणू, अशी घ्या काळजी

कोरोना विषाणू संक्रमणासंदर्भात (Corona Virus) केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून पुन्हा नवीन मार्गदर्शत सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. कोरोनापासून बचावासाठी कशी खबरदारी घ्यायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 20 मे: कोरोना विषाणू संक्रमणासंदर्भात (Corona Virus new guidelines by Modi government) केंद्र सरकारच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाकडून पुन्हा नवीन मार्गदर्शत सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, सध्या कोरोना विषाणूची (Coronavirus In India) परिस्थिती बिकट असून सर्वांना या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा त्याच सर्वसाधारण नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्स-CoV-2 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी लागेल. मार्गदर्शत सूचनांमध्ये सांगितलं आहे की, घर, कार्यालयांमध्ये हवेचे वेंटिलेशन चांगले राखण्यासाठी प्रयत्न करावेत. वेंटिलेशन चांगल्याप्रकारे राहण्याचा खूप फायदा होतो. घर, ऑफिस किंवा इतर ठिकाणी वेंटिलेशन चांगले असेल तर एखाद्या कोरोनाबाधित रुग्णापासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचे प्रमाण कमी असते. पंखे कसे असावेत यासाठीच्याही सूचना सेंट्रल एअर मॅनेजमेंट सिस्टम असलेल्या इमारतींमध्ये सेंट्रल एअर फिल्टर प्रणालीमध्ये सुधारणा केल्यानं त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. ऑफिस, ऑडिटोरियम, शॉपिंग मॉल इत्यादी ठिकाणी गॅबल फॅन सिस्टीम आणि रूफ वेंटिलेटरचा उपयोग करावा, असे सांगण्यात आले आहे. पंखे कशा पद्धतीनं बसवले आहेत हे फार महत्त्वाचे आहे. पंख्याच्या वाऱ्याचा झोत असा असू नये की, दूषित हवा एकाकड़ून दुसऱ्याकडे जात राहील, असे सूचनांमध्ये सांगितले आहे. 2 मीटरपर्यंत आजूबाजूला पडतात ड्रॉपलेट्स केंद्र सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने दिलेल्या सूचनांनुसार सांगितले आहे कि, एरोसोल आणि ड्रॉपलेट्सद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग वेगानं फैलावू शकतो. एरोसोल हे हवेत 10 मीटरपर्यंत जावू शकतात. कोरोना संक्रमित व्यक्तीपासून 2 मीटरच्या अंतरामध्ये ड्रॉपलेट्स पडत असतात. एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसली तरी सुद्धा त्याच्याकडून भरपूर प्रमाणात ड्रॉपलेट्स बाहेर येवू शकतात. ज्यामुळे त्या भागात संपर्कात येणाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते, असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. हे वाचा - चाळीशीनंतरही इतका मेकअप का करते? श्वेता तिवारीनं सांगितलं ग्लॅमरस दिसण्याचं खरं कारण कोरोनाबाधित व्यक्तीकडून श्वास सोडणं, बोलणं, गाणं म्हणणं, हसणं, खोकणं किंवा शिंकण्यामुळं नाका-तोंडाद्वारे ड्रॉपलेट्स आणि एरोसोल बाहेर पडू शकतात आणि त्यामुळं या घातक विषाणूचा इतरांना संसर्ग होऊ शकतो. यासाठी खबरदारी म्हणून सर्वांनी डबल मास्क किंवा एन-95 मास्क वापरणं गरजेचे आहे. मास्क किंवा तोंडाला काहीतरी बांधून आपण स्वत:चा विषाणूपासून बचाव करू शकतो. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्ग दर कमी करण्यासाठी सर्व नागरिक, समुदाय, स्थानिक संस्था, कर्मचारी वर्ग या सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. सर्वांनी नियम पाळल्यास आपण कोरोनाला हरवू शकतो. मास्क, व्हेंटिलेशन, सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचा अवलंब करून आपण कोरोना विरुद्धचा लढा जिंकू शकतो असं मार्गदर्शत सूचनांमध्ये सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid-19

    पुढील बातम्या