नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : देशभरात कोरोना रुग्णांच्या (Corona Virus) संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये कोरोनाचा (Covid-19) आलेख चढता आहे, याची गंभीर दखल डीजीसीए (DGCA) म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने घेतली आहे. डीजीसीएने विमान प्रवासाबाबत नव्या गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे विमान प्रवासादरम्यान प्रवाशांनी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रवाशांनी विमान प्रवासादरम्यान मास्क घालत आहेत हे एयरलाईन कंपन्यांनी पाहावं, असं डीजीसीएच्या नव्या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे. एयरपोर्ट आणि सगळ्या सार्वजनिक ठिकाणी जिकडे प्रवाशांची ये-जा जास्त आहे तो भाग सॅनिटाईज करण्यात यावा, असंही या गाईडलाईन्समध्ये सांगण्यात आलं आहे. जर प्रवासी नियमांचं पालन करत नसेल तर एयरलाईन त्याच्यावर कठोर कारवाई करेल, असा इशाराही डीजीसीएने दिला आहे.
DGCA orders airlines to strictly comply with COVID-19 protocols inside aircraft
— ANI Digital (@ani_digital) August 17, 2022
Read @ANI Story | https://t.co/i9u6qxLtNI
#DGCA #COVID19 pic.twitter.com/vAAya82UA4
भारतात एका दिवसात कोरोनाचे 14,917 रुग्ण समोर आले आहेत, यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,17,508 एवढी झाली आहे. भारतात आतापर्यंत 4,42,68,381 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी 8 वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे देशातल्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 5,27,069 एवढी झाली आहे.

)







