नवी दिल्ली, 26 जुलै : देशात कोरोनानं थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 48 हजार 661 नवीन रुग्ण सापडले, तर 705 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 झाली आहे. यातील 4 लाख 67 हजार 882 रुग्ण सक्रीय आहेत. तर, 8 लाख 85 हजार 577 रुग्ण निरोगी झाले आहेत. 32 हजार 063 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट 63.9% झाला आहे.
मुख्य म्हणजे शनिवारी देशात सर्वात जास्त कोरोना चाचणी करण्यात आल्या. एकाच दिवसात 4.42 लाख चाचण्या करण्यात आल्या. यासह देशात एकूण 1 कोटी 63 लाख लोकांची चाचणी करण्यात आली आहे. गेल्या 30 दिवसात सगळ्यात जास्त कोरोना चाचण्या करण्यात आल्या. तर, जगभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
Single-day spike of 48,661 positive cases & 705 deaths in India in the last 24 hours.
— ANI (@ANI) July 26, 2020
Total #COVID19 positive cases stand at 13,85,522 including 4,67,882 active cases, 8,85,577 cured/discharged/migrated & 32,063 deaths: Health Ministry pic.twitter.com/Qk11TYzDbQ
महाराष्ट्रात 24 तासांत उच्चांकी 9251 रुग्णांची वाढ झाली. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दररोज रुग्णांची संख्या 8 ते 10 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. तर 257 एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 66 हजार 368 एवढी झाली आहे. तर 13 हजार 389 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. मुंबईत 1080 रुग्णांची वाढ झालीय. त्यामुळे एकूण संख्या 108060 एवढी झाली आहे. तर आज 7 हजार 227 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
इतर राज्यांची स्थिती
कर्नाटक राज्यांत आता दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त सक्रीय रुग्ण आहेत. याबाबत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात 1 लाख 45 हजार 785 सक्रीय रुग्ण आहेत. तर कर्नाटकात 55 हजार 396 आहेत. तिसऱ्या क्रमांकावर 52 हजार 273 रुग्णांसह तमिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona