नवी दिल्ली, 17 जून: देशात कोरोना (Corona Infection) ची तिसरी लाट आटोक्यात आली आहे. मात्र काही संकटं कमी होताना दिसत नाही आहेत. देशातल्या काही राज्यांमध्ये अॅक्टिव्ह (Active Patients) रुग्णांची संख्या हे एक मोठं संकट उभं ठाकलं आहे. बुधवारी देशात कोरोनाचे (Corona) 67 हजार 208 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले. त्यात 2330 रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, देशात आताही अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 लाख 26 हजार 740 आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी होत असताना चार राज्यांमध्ये कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण अधिक आहे. जवळपास एक लाखांच्या आसपास कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये आताही कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 51 हजार 566 आहे. तर महाराष्ट्रातही 1 लाख 36 हजार 661 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याव्यतिरिक्त तमिळनाडूमध्ये कोरोनाचे 1 लाख 14 हजार आणि केरळमध्ये 1 लाख 9 हजार 799 अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आहे. या राज्यांव्यतिरिक्त असेही काही राज्य आहेत, तिथली परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
हेही वाचा- चिंताजनक! महाराष्ट्राला तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा अधिक धोका
आंध्र प्रदेशमध्ये आताही कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 71 हजारांहून जास्त आहे. या राज्यांमध्ये कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहिल्यास त्यांचा एकूण आकडा 5 लाख 80 हजारांवर आहे. जो एकूण अॅक्टिव्ह रुग्णांच्या 70 टक्के इतका आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या सारख्या राज्यांना सर्वाधिक बसला. एवढंच काय तर कर्नाटक राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढले. सध्या ओडिशामध्येही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगानं वाढतोय. आंध्र प्रदेशाताही अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 42 हजारांच्या घरात आहेत. आसाममध्ये 38 हजारांवर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.