Home /News /national /

कोरोनावर पुढील 4 महिन्यांत अनेक औषधं उपलब्ध होणार, CSIR महासंचालकांनी दिली माहिती

कोरोनावर पुढील 4 महिन्यांत अनेक औषधं उपलब्ध होणार, CSIR महासंचालकांनी दिली माहिती

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

भारत बायोटेक (Bharat Biotech) ची Covaxin आणि झाइडस कॅडिलाची ZyCoVD च्या दोन कंपन्या आणि सिरमचं काम प्रगती पथावर आहेत.

'कोरोनावर आगामी चार महिन्यात अजून काही औषधे उपलब्ध होणार आहेत.'

नवी दिल्ली, 24 जुलै : 'सध्या भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोना लशीवर (Corona Vaccine) संशोधन सुरू आहे. जगात चार लशी या फ्रंटरनर आहेत. या सर्व लशींच्या तिसऱ्या टप्याच्या चाचणीचे निकाल आल्यानंतर सर्व सामान्य लोकांकरिता ही लस उपलबध्द होणार आहे. भारतात लस उत्पादन आणि वितरणाचे सुदृढ जाळे आहे. त्यामुळे लोकांपर्यंत ही लस पोहचण्याची अडचण येणार नाही,' अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी दिली आहे. 'भारतात देखील कोरोना लस तयार होत आहे. या लशीच्या पहिल्या चाचणीचे निकाल आल्यानंतर सरळ तिसरी चाचणी करण्यात येणार आहे. यासोबतच लशीच्या तुलनेत औषधावरील संशोधन अतिशय प्रगत आहे. फेरमविर सारखे जेनेरिक औषध देशात उपलब्ध आहे. आगामी चार महिन्यात अजून काही औषधे उपलब्ध होणार आहेत,' असे मतही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, ऑक्सफर्डच्या कोरोना लशीचं (Oxford corona vaccine) पहिल्या टप्प्यातील ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याने आता आशा पल्लवित झाल्या आहेत. ही लस लवकरात लवकर उपलब्ध होईल, अशी अपेक्षा प्रत्येकाला आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युचीही या लशीच्या निर्मितीत भागीदारी आहे, त्यामुळे भारतातही ही लस उपलब्ध होणार आहे. मात्र या लशीची किंमत असेल, सर्वसामान्यांना ही लस परवडणारी असेल का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (pune serum institute of india)) दिलेल्या माहितीनुसार भारतात उपलब्ध होणाऱ्या ऑक्सफर्डच्या कोरोना लशीची किंमत ही एक हजारपेक्षाही कमी असेल. ही किंमत सर्वसामान्यांनाही परवडण्यासाराखी आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Corona vaccine

पुढील बातम्या