नवी दिल्ली: ‘महाराष्ट्र सदना’त कोरोनाचा उद्रेक, कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांसह 17 जण बाधित

नवी दिल्ली: ‘महाराष्ट्र सदना’त कोरोनाचा उद्रेक, कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांसह 17 जण बाधित

संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने महाराष्ट्र सदनात लोकांची वर्दळ वाढली आहे. राज्यभरातून नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्र सदनात येत असतात.

  • Share this:

नवी दिल्लीत 17 सप्टेंबर: राजधानी दिल्लीतल्या नवीन महाराष्ट्र सदनात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. तब्बल 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आज स्पष्ट झालं. महाराष्ट्र सदनामध्ये निवासाला आहे अनेक लोकसभा व राज्यसभेचे खासदार आहेत. यात सदनात असलेल्या कॅन्टीन मधील 4 कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने महाराष्ट्र सदनात लोकांची वर्दळ वाढली आहे. राज्यभरातून नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्र सदनात येत असतात. त्यामुळे संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात दिवसभरात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांमध्ये उच्चांकी 24 हजार 619 नवे रूग्ण आढळून आलेत. तर 389 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 11 लाख 45 हजार 840 एवढी झाली आहे. दिवसभरात 19 हजार 522 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रिकव्हरी रेट हा 70.90 एवढा झाला आहे.

राज्याचा मृत्यू दर हा 2.47 टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज सध्या 3 लाख 1 हजार 700  रुग्णावर उपचार सुरू आहेत. अनावश्यक गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे दररोजचे व्यवहार पूर्ववत होत असतांनाच कोरोनाला कसं रोखायचं हा प्रश्न सरकारपुढे आहे

Published by: Ajay Kautikwar
First published: September 17, 2020, 9:40 PM IST

ताज्या बातम्या