भुवनेश्वर, 2 जून : ओडिसामध्ये ट्रेनचा मोठा अपघात झाला आहे. बालासोरच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती की कोरोमंडल एक्स्प्रेस (12841) चे पाच डब्बे पटरीवरून उतरले. या अपघातामध्ये 50 जण जखमी झाले आहेत, तर काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. बचाव कार्यासाठी आपत्कालिन टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
#WATCH | Coromandel Express derails near Bahanaga station in Balasore, Odisha. pic.twitter.com/9Lk2qauW9v
— ANI (@ANI) June 2, 2023
बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यालाही सर्व आवश्यक व्यवस्था करायला आणि घटनास्थळी पोहोचायला सांगितलं आहे, असं विशेष मदत आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच अधिकच्या मदतीची आवश्यकता असेल तर एसआरसीला सूचित करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. एसआरसीने आपत्कालिन कंट्रोल रूमचा नंबरही जाहीर केला आहे : 0678 2262286
ही ट्रेन पश्चिम बंगालच्या शालिमार स्टेशनहून निघते आणि चेन्नईच्या पुरातची थालिवार डॉ.एम.जी रामचंद्रन सेन्ट्रल रेल्वे स्टेशनपर्यंत जाते. दुपारी 3.30 वाजता ही ट्रेन निघणारी ही ट्रेन बालासोरला संध्याकाळी 6.30 वाजता पोहोचते. ही ट्रेन चेन्नईला उद्या दुपारी 4.50 वाजता पोहोचणार होती. ट्रेनच्या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

)







