मराठी बातम्या /बातम्या /देश /

शशी थरूर यांच्या पोस्टनंतर उलट-सुलट चर्चा; यावर तुम्हाला काय वाटतं?

शशी थरूर यांच्या पोस्टनंतर उलट-सुलट चर्चा; यावर तुम्हाला काय वाटतं?

या सर्व चर्चेनंतर शशी थरूर यांनी यावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व चर्चेनंतर शशी थरूर यांनी यावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

या सर्व चर्चेनंतर शशी थरूर यांनी यावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 29 नोव्हेंबर : काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) हे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करीत असतात. काही दिवसांपूर्वी इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये (India vs England 4th Test) भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टीममध्ये दोन बदल केले. आर. अश्विन (R Ashwin) याला टीममध्ये न घेतल्याबद्दल काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी विराट कोहलीवर निशाणा साधला होता.

आता मात्र शशी थरूर यांच्या पोस्टवर उलट-सुलट चर्चा सुरू आहे.

शशी थरून यांनी महिला खासदारांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनवर उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'कोण म्हणतं की, लोकसभा ही काम करण्यासाठी Attractive जागा नाही? आज सकाळी माझ्या सहकारी महिला खासदारांसोबत...'. या पोस्टमधील Attractive या शब्दावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. एका तरुणीनेही शशी थरूर यांना अशा प्रकारची पोस्ट करून तुम्ही महिलांचा अपमान करीत असल्याचं सुनावलं.

याशिवाय काहींनी ही कॅप्शन खूप सहन घेतली आहे.

या सर्व चर्चेनंतर शशी थरूर यांनी यावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. कोणालाही दुखावण्याचा आपला कोणता हेतू नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अद्याप या फोटोतील कोणा महिला खासदाराने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

First published:

Tags: Mp, Parliament, Shashi tharoor