Home /News /national /

...तर काँग्रेसच सचिन पायलट यांच्यावर कारवाई करणार, राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट

...तर काँग्रेसच सचिन पायलट यांच्यावर कारवाई करणार, राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे सचिन पायलट काँग्रेसपासून दूर जाण्याच्या भूमिकेत आहे.

    नवी दिल्ली, 13 जुलै : कर्नाटक, मध्य प्रदेशात सत्तांतर घडवून आणल्यानंतर आता भाजपने (BJP) राजस्थानकडे आपला मोर्चा वळवला आहे. राजस्थानचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट पक्षावर नाराज आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे सचिन पायलट काँग्रेसपासून दूर जाण्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक हादरा बसण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसला काठावरचं बहुमत आहे. अशातच काँग्रेसकडे असलेल्या आमदारांपैकी जवळपास 30 आमदार हे पायलट गटाचे असल्याची माहिती आहे. त्यामुळे सचिन पायलट यांनी वेगळी भूमिका घेतल्यास काँग्रेस सरकार कोलमडणार हे निश्चित आहे. सचिन पायलट भाजप अध्यक्षांना भेटणार? सचिन पायलट हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र आज ही भेट होणार नसल्याची माहिती आहे. कारण सध्या भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाची आज महत्त्वपूर्ण बैठक होत असून या बैठकीनंतर भाजप पावलं उचलणार असल्याची माहिती आहे. ...तर सचिन पायलट यांच्यावर होणार कारवाई काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आज आयोजित केली आहे. या बैठकीत सचिन पायलट सहभागी होणार नसल्याची माहिती आहे. सचिन पायलट विधिमंडळ पक्षाच्या बैठकीस उपस्थित न राहिल्यास पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता आहे. राजस्थान राजकीय नाट्य पक्षीय बलाबल काँग्रेस 107 भाजप 72 अपक्ष 13 राष्ट्रीय लोक दल 1 राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष 3 सीपीएम 2 भारतीय ट्रायबल पक्ष 2 काँग्रेस आणि अपक्ष पाठिंब्याचे सरकार एकूण जागा 200 दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल दिवसभरात अनेकदा राष्ट्रीय संघटना महासचिव केसी वेणुगोपाल, वरिष्ठ नेता अहमद पटेल आणि राष्ट्रीय महासचिव अविनाथ पांडे यांच्याशी चर्चा केली. गहलोत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पांडे यांनी पायलट यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संभाषण होऊ शकले नाही.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Congress, Rajsthan, Sachin pilot

    पुढील बातम्या