Home /News /national /

बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर सोनियांची 'ममता', बड्या नेत्याचा पत्ता कट करण्याची तयारी!

बंगालच्या मुख्यमंत्र्यांवर सोनियांची 'ममता', बड्या नेत्याचा पत्ता कट करण्याची तयारी!

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

    नवी दिल्ली, 4 जुलै : देशातील आगामी राजकाराणाचा विचार करुन काँग्रेस (Congress) पक्ष बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेसच्या याच प्रयत्नाचा भाग म्हणून पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी  (Sonia Gandhi) लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांना सोनिया गांधी पदावरुन दूर करण्याचा निर्णय लवकरच घेतील, असं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.चौधरींना हटवून नव्या नेत्याकडं गटनेतेपद सोपवले जाऊ शकते. संसदेच्या मान्सून सत्राच्याआधी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अधीर रंजन चौधरी हे बंगालमधील बहरामपूरचे खासदार आहेत. ते बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्य चेहरा होते. चौधरी हे जी-23 या काँग्रेसमधील गटाचे मोठे टिकाकार म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटनेत बदल करण्याची मागणी करणारं पत्र या 23 जणांच्या गटानं मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात  सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्यावेळी चौधरी यांनी या गटावर टीका केली होती. प्रसिद्ध अभिनेत्रीने काँग्रेस नेत्यासोबत तोडलं नातं; 3 महिन्यांपूर्वीच केला होता भव्य साखरपुडा चौधरी यांना का हटवणार? भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात तृणमूल काँग्रेसशी समन्वय साधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चौधरींना पदावरुन दूर केले जाऊ शकते. चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांशी युती करुन ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आघाडी उघडली होती. ते ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारचे विरोधक आहेत. तर दुसरिकडे काँग्रेस हायकमांडने विधानसभा निवडणुकीत ममतांवर टीका करणे टाळले होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने अनेक वेळा ममतांना मदत केली आहे. आता चौधरींना हटवून संसदेतही तृणमूलशी हातमिळवणी करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. कोण घेणार जागा? लोकसभेतील काँग्रेस गटनेता होण्याच्या शर्यतीमध्ये केरळमधील खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) आणि पंजाबमधील खासदार मनिष तिवारी (Manish Tewari) यांचे नाव आघाडीवर आहे. हे दोघाही सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या जी -23 गटाचे सदस्य आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची गटनेता होण्याची इच्छा आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Congress, Mamata banerjee, Sonia gandhi

    पुढील बातम्या