जाहिरात
मराठी बातम्या / देश / सभा न घेताच प्रणिती शिंदे यांना माघारी परतावं लागलं; कर्नाटकात नेमकं काय घडलं?

सभा न घेताच प्रणिती शिंदे यांना माघारी परतावं लागलं; कर्नाटकात नेमकं काय घडलं?

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे

कर्नाटक राज्यातील देसुरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना आज सभा न घेताच माघारी परतावं लागलं आहे.

  • -MIN READ Karnataka
  • Last Updated :

देसुर, 5 मे : कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेतेही आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी जोर लावून उतरले आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. काल (4 मे) बेळगावात प्रचारासाठी गेलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांना महाराष्ट्र एकीकरण समितीने काळे झेंडे दाखवून विरोध केला होता. तर आज काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळूण देण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय नेते मराठी भाषिक प्रदेशात आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी जात आहे. मात्र, या नेत्यांविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. देसुरमध्ये आज काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिंदे यांच्या सभा स्थळी घोषणाबाजी करत सभा उधळूण लावण्यात आली. ग्रामस्थांचा विरोध पाहून सभा न घेताच प्रणिती शिंदे यांना माघारी परतावं लागलं.

जाहिरात

अशोक चव्हाण यांना बेळगावात दाखवले काळे झेंडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत प्रचार अंतिम टप्प्यात आहे. 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि सतेज पाटील आज पक्षाच्या प्रचारासाठी बेळगावात आले होते. यावेळी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ आले होते. यावेळी बेनकनहळ्ळी या गावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी काळे झेंडे दाखवत अशोक चव्हाण आणि सतेज पाटील यांचा निषेध केला. वाचा - शरद पवारांच्या पत्रकार परिषदेत गैरहजर असलेले अजितदादा आले समोर, म्हणाले… फडणवीसांनाही काळे झेंडे याआधी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. बेळगाव येथील प्रचार सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदी आल्यानंतर भ्रष्टाचार थांबला. टॅक्सची चोरी थांबवली. काळा पैसा तिजोरीत आला. मूठभर लोकांनी त्याच्या तिजोरीत ठेवलेला पैसा मोदी यांनी परत आणला. देशाला एकसंघ करण्याचे काम मोदी करत आहेत. प्रगतीमध्ये डबल इंजिन महत्त्वाचे आहे. मागच्या निवडणुकीत 105 आले होते. भाजपला थोडे कमी पडले होते. मग त्यानंतर कर्नाटकमध्ये सर्कस पाहायला मिळाली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात