मराठी बातम्या /बातम्या /देश /

500 आणि 2000 च्या नोटांवरील महात्मा गांधींचे चित्र हटवा; काँग्रेस आमदाराची थेट मोदींकडे मागणी

500 आणि 2000 च्या नोटांवरील महात्मा गांधींचे चित्र हटवा; काँग्रेस आमदाराची थेट मोदींकडे मागणी

याबाबत आमदार कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचे चित्र 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची मागणी केली आहे.

याबाबत आमदार कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचे चित्र 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची मागणी केली आहे.

याबाबत आमदार कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचे चित्र 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची मागणी केली आहे.

    जयपूर, 09 ऑक्टोबर : 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरील महात्मा गांधींचे (Mahatma Gandhi) चित्र काढण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. राजस्थान काँग्रेसचे आमदार भरतसिंह कुंदनपूर (Congress mla bharat singh) यांनी ही मागणी केली आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिलं आहे. राजस्थानसह संपूर्ण देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे, भ्रष्टाचार प्रकरणांवरून तीव्र नाराजी व्यक्त करत काँग्रेस आमदारांनी या नोटांवरील गांधीजींचे छायाचित्र काढण्याची मागणी केली आहे. याबाबत आमदार कुंदनपूर यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून महात्मा गांधींचे चित्र 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून हटवण्याची मागणी केली आहे. या मोठ्या किमतीच्या नोटा भ्रष्टाचारासाठी वापरल्या जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा गांधींजींचा अपमान आहे. या काँग्रेस आमदारांनी आपल्याच पक्षाच्या सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आमदार भरत सिंह यांनी लिहिलं आहे की, राजस्थानमध्ये जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2020 दरम्यान एकूण 616 भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ज्यात दररोज सरासरी भ्रष्टाचाराची दोन प्रकरणे नोंदवली जातात. या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये फक्त 500 आणि 2000 रुपये लाचखोरीसाठी वापरले जात आहेत. हे वाचा - खाकीतले देवदूत: 80 वर्षांच्या आजींना स्वतः उचलून पोहोचवलं देवीच्या मंदिरापर्यंत; रियाझ आणि रितेशवर होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO लहान नोटांवर वापर असावा 2 ऑक्टोबर रोजी गांधींच्या 152 व्या जयंतीनिमित्त काँग्रेस आमदाराने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवले होते. यामध्ये त्यांनी पंतप्रधानांना उच्च मूल्याच्या चलनी नोटांवरील गांधीजींचे चित्र त्यांच्या आयकॉनिक चष्म्याच्या चित्रासह बदलण्याची विनंती केली आहे. हे वाचा - वयाच्या 60व्या वर्षी 2 कोटी रुपये हवे असतील, तर दरमहा किती रुपयांची SIP करावी? वाचा सविस्तर सांगोड मतदारसंघाचे आमदार भरत सिंह म्हणाले की, 'गांधींचे छायाचित्र फक्त 5, 10, 50, 100 आणि 200 रुपयांच्या नोटांवर ठेवावे, कारण याच नोटा मोठ्या प्रमाणावर गरीब लोक वापरतात आणि गांधींजींनी संपूर्ण आयुष्य अशा लोकांच्या सेवेत घालवले असून त्यांनी निराधारांसाठी काम केले. माझे म्हणणे आहे की, हवेच असल्यास गांधींच्या चष्म्याचे चित्र 500 आणि 2,000 रुपयांच्या नोटांवर वापरले जाऊ शकते. याशिवाय अशोक चक्र देखील वापरले जाऊ शकते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Congress, Mahatma gandhi, Narendra modi

    पुढील बातम्या