पायलट क्रॅश करणार सरकार; मोठ्या घोषणांनी अडचणीत आली अशोक गहलोतांची खुर्ची

पायलट क्रॅश करणार सरकार; मोठ्या घोषणांनी अडचणीत आली अशोक गहलोतांची खुर्ची

पायलट यांच्या जवळील सुत्रांनी एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे

  • Share this:

जयपुर, 12 जुलै : तब्बल पावणे दोन वर्षांपूर्वी राजस्थानात सत्तेत आलेली काँग्रेस 23 दिवसांपूर्वी राज्यसभा निवडणुकीनंतर पुर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसत होते. स्वत: मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि पार्टीचे इतक ज्येष्ठ नेतेही त्यांच्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून पुढील 5 वर्षे काही चिंता नसल्याने आश्वस्त होते. मात्र गहलोत सरकार आता संकटाच्या फेऱ्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

गहलोत आणि पार्टीच्या इतर नेत्यांचं संकट उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांमुळे वाढली आहे.

आज रविवारी दिवसभर जयपूरहून दिल्लीपक्यंत काँग्रेसची कारवाई वाढत होती. गहलोत यांची दिवसात अनेकदा राष्ट्रीय संघटना महासचिव केसी वेणुगोपाल, वरिष्ठ नेता अहमद पटेल आणि राष्ट्रीय महासचिव अविनाथ पांडे यांच्याशी बातचीत झाली. गहलोत यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पांडे यांनी पायलट यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संभाषण होऊ शकले नाही.

हे वाचा-गँगस्टर विकास दुबेच्या एन्काऊंटरमुळे ब्राम्हण समाजात भय - मायावती

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता सचिन पायलट उद्या होणारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होणार नाही. पायलट यांच्या जवळील सुत्रांनी सांगितले की, 30 हून अधिक काँग्रेस आणि काही निर्दलीय आमदारांनी सचिन पायलट यांना समर्थन देण्याचं वचन दिलं आहे. ज्यामुळे गहलोत सरकार अल्पमतात येऊ शकतं.

Published by: Meenal Gangurde
First published: July 12, 2020, 10:22 PM IST

ताज्या बातम्या