जाहिरात
मराठी बातम्या / देश / Karnataka Hijab Controversy: वादात प्रियंका गांधींचीही उडी; म्हणाल्या, ''बिकिनी किंवा...''

Karnataka Hijab Controversy: वादात प्रियंका गांधींचीही उडी; म्हणाल्या, ''बिकिनी किंवा...''

Karnataka Hijab Controversy: वादात प्रियंका गांधींचीही उडी; म्हणाल्या, ''बिकिनी किंवा...''

Hijab Controversy: कर्नाटकातील (Karnataka) शाळा आणि महाविद्यालयांमध्ये (schools and colleges) मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्यावरून वाद (Controversy) सुरु आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कर्नाटक, 09 फेब्रुवारी: कर्नाटकातील (Karnataka) शाळा आणि महाविद्यालयांमध्ये (schools and colleges) मुस्लिम मुलींनी हिजाब घालण्यावरून वाद (Controversy) सुरु आहे. आता या वादात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ही उडी घेतली आहे. बिकिनी असो वा बुरखा किंवा जीन्स असो, महिलांना हवं ते परिधान करणं हा त्यांचा अधिकार आहे, असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे. प्रियंका गांधी यांनी यूपीमध्ये काँग्रेससाठी दिलेल्या ‘लडकी हूं लड़ सक्ते हूं’ या घोषणेचाही उल्लेख केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, हा अधिकार भारतीय राज्यघटनेनं दिला आहे. महिलांवरील अत्याचार थांबवा. प्रियंका गांधी यांनी ट्विट केलं की, ‘मग ती बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो किंवा हिजाब असो. त्यांना हवे ते परिधान करणं हा महिलांचा अधिकार आहे. त्यांना हा अधिकार घटनेनं दिलेला आहे. महिलांची छेडछाड थांबली पाहिजे.

जाहिरात

हिजाबच्या वादामागे काँग्रेसचा हात असल्याचे भाजपने म्हटले आहे. कर्नाटक भाजपने ट्विट केले कि, हिजाब वादाच्या जन्मामागे काँग्रेसचा हात असल्याचे आम्ही म्हणत आहोत. हायकोर्टात हिजाबच्या बाजूने युक्तिवाद करणारे वकील काँग्रेसच्या कायदेशीर सेलचे प्रतिनिधी आहेत. काँग्रेस या दिशेने काम करत आहे हे सांगण्यासाठी दुसरे उदाहरण हवे का? भाजपच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना (काँग्रेस हिजाबच्या वादामागे आहे कारण त्यांच्या कायदेशीर सेलचे प्रतिनिधी कोर्टात केसचे प्रतिनिधित्व करत आहेत), वकील देवदत्त कामत म्हणाले, मी सुदैवाने स्वतंत्र देशात राहतो. एक वकील या नात्याने, मला निर्देशित केलेल्या कोणत्याही विषयावर मी हजर राहून युक्तिवाद करतो. कोणताही तृतीय पक्ष किंवा कोणताही राजकीय पक्ष माझ्या निवडीवर शंका घेऊ शकत नाही. भाजपचे आयटी सेल प्रभारी अमित मालवीय यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकात आपण जे पाहत आहोत ते ज्ञानाचा शोध आहे, असं ते म्हणालेत. धर्माच्या नावाखाली तरुणींना शिक्षणाऐवजी हिजाब निवडण्यास सांगितलं जात आहे. राज्य सरकारने तीन दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय सरकारने सर्व पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. NSUI ने कर्नाटक कॉलेजमध्ये भगव्या ध्वजऐवजी तिरंगा फडकवला काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने कर्नाटकातील फर्स्ट ग्रेड कॉलेजमध्ये तिरंगा ध्वज फडकवला. एनएसयूने दावा केला आहे कि, यापूर्वी येथे भगवा झेंडा फडकवण्यात आला होता. एनएसयूआयने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिला आहे. तिरंगा सर्वोच्च आहे आणि सर्वोच्च राहील. जातीयवादी शक्तींनी कितीही प्रयत्न केले तरी धर्माच्या नावाखाली देश द्वेषाच्या आगीत आम्ही पेटू देणार नाही. आरएसएस-भाजप जिथे जिथे देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करेल तिथे एनएसयूआय त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्याचे काम करेल, असं विद्यार्थी संघटनेनं म्हटलं आहे. कर्नाटकात तीन दिवस हायस्कूल आणि कॉलेज बंद हिजाबच्या वादावरून राज्यात तीन दिवस हायस्कूल आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार राज्यातील हायस्कूल आणि महाविद्यालये 3 दिवसांसाठी बंद करण्यात आली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात