• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • न्या. जोसेफ यांच्या बढतीचा निर्णय अद्याप लांबणीवरच

न्या. जोसेफ यांच्या बढतीचा निर्णय अद्याप लांबणीवरच

उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या सुप्रीम कोर्टात नियुक्तीवरून वाद सुरूच आहे. सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमची काल बैठक झाली. त्यात यावर निर्णय घेण्यात आली नाही.

  • Share this:
03 मे : उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या सुप्रीम कोर्टात नियुक्तीवरून वाद सुरूच आहे. सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमची काल बैठक झाली. त्यात यावर निर्णय घेण्यात आली नाही. येत्या काही दिवसांत निर्णय घेण्यात येईल, अशी अशा व्यक्त करण्यात येतेय. तर दुसरीकडे, केंद्र सरकारच्या निर्णयाचा न्यायमूर्ती जोसेफ यांनी दिलेल्या निर्णयांशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलं. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजिअमची महत्वपूर्ण बैठक मंगळवारी संध्याकाळी संपली. यावेळी उत्तराखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या पदोन्नतीबाबत चर्चेदरम्यान कोणताही निर्णय झाला नाही. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या बैठकीत न्या. जोसेफ यांचे सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी नियुक्तीसाठी नाव पाठवण्यात आले नाही. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. मदन लोकूर आणि न्या. कुरियन जोसेफ या बैठकीत उपस्थित होते. कॉलेजिअमने १० जानेवारी रोजी न्यायमूर्ती जोसेफ आणि वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांना पदोन्नती देऊन सुप्रीम कोर्टात न्यायाधीशपदी घेण्याची शिफारिश केली होती. सरकारने या प्रकरणी न्या. जोसेफ यांच्या फाईलवर पुनर्विचारासाठी पुन्हा कॉलेजिअमकडे पाठवून दिली होती. मात्र, मल्होत्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. यावेळी केंद्र सरकारने म्हटले होते की, अनेक वरिष्ठ न्यायाधीशांकडे दुर्लक्ष करीत न्या. जोसेफ यांच्या नावाची शिफारिश करण्यात आली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने असेही म्हटले होते की, हा प्रस्ताव सुप्रीम कोर्टाच्या मानकांशी अनुकूल नाही. न्या. जोसेफ यांची फाईल पुन्हा पाठवण्यात आल्याने विरोधीपक्षाने सरकारवर टीका केली होती. न्यायव्यवस्थेत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
First published: