जयपूर, 3 जून : कोब्रा असं नाव जरी घेतलं तरी अनेकांची गाळण उडते, त्यातही काळ्या रंगाचा कोब्रा (Black Cobra) असेल तर मग अनेकांची पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहत नाही. सकाळी उठल्यानंतर टॉयलेटमध्ये गेल्यावर एखाद्याला असा कोब्रा (Cobra) दिसला तर मग काय होईल. मात्र, अशी धक्कादायक घटना एके ठिकाणी उघडकीस आली आहे. टॉयलेटमध्ये गेल्यावर समोर चक्क कोब्रा (Cobra) दिसल्यानं चांगलाच गोंधळ उडाला. त्यानं धावत पळत बाहेर येत घरातील इतरांना याची माहिती दिली. फणा काढून बसलेला कोब्रा पाहून घरातील सर्वांचीच गाळण उडाली. या घटनेची माहिती त्यानंतर पोलिसांना देण्यात आली. पोलीसही लगेच आल्यानंतर त्यांनी या सापाला पकडून सुरक्षितरित्या जंगलामध्ये सोडून दिलं. बचाव पथकानं एका दुसऱ्या ठिकाणी किचन जवळूनही एक स्पेक्टॅकल कोब्रा पकडून त्याला सुरक्षित स्थळी सोडलं. हा सर्व प्रकार राजस्थानमधील पुष्करच्या एका बासेली गावातील आहे. दोन्ही सापांना बाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांना आणि परिसरातील लोकांना हायसं वाटलं. टॉयलेट आणि स्वयंपाक घरात कोब्रा घुसल्याची माहिती मला देण्यात आली होती, त्यानंतर लगेचच आम्ही या ठिकाणी पोहोचलो आणि आणि दोन्ही सापांना पकडून जंगलामध्ये सोडून दिलं आहे, असे या कोब्रा पकडणाऱ्या राजेंद्र बचाने यांनी सांगितले. या परिसरात आम्हाला दोन ठिकाणी कोब्रा असल्याची माहिती मिळाली होती. टॉयलेटमध्ये सापडलेला कोब्रा जवळपास सात ते आठ फूट लांब होता. सर्वेश्वर कॉलनीमध्ये किचनमध्ये असलेल्या कोब्राला देखील पकडण्यात आल असं, पोलीस मित्र आणि बचाव पथकाचे प्रभारी अमित भट्ट यांनी सांगितलं. हे वाचा - मैत्री, प्रेम, विवाह आणि घटस्फोट; लग्नाच्या काही वर्षांतच मोडला ‘या’ प्रसिद्ध कलाकारांचा संसार कोब्रा असल्याचे पाहून आम्ही घरातील सर्वजण फारच घाबरलो होतो. बचाव पथकानं येऊन लगेच या सापाला पकडलं, त्यामुळे आता भीती कमी झाली आहे. मात्र, ही भीतीदायक घटना विसरण्यास बराच वेळ जाणार आहे, वारंवार इकडे तिकडे साप तर नसेल ना असं वाटून भीती वाटण्याची शक्यता आहे, असे घर मालक म्हणाले. सापांचे विषारी आणि बिनविषारी असे प्रकार असतात. भारतात आढणारे जास्तीत-जास्त सापांचे प्रकार हे बिनविषारी प्रकारातील असतात. त्यातील कोब्रा साप हा अतिशय विषारी प्रकारातील आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







