कोरबा, 1 जुलै : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील धनधानी गावात एक महिला जंगलात काही गोळा करण्यासाठी गेली असता एका विषारी कोब्रा या सापाने तिला दंश केला. सापाने दंश केल्यावर महिला विव्हळत होती पण तिने सापाला जागेवरच धडा शिकवला आणि त्याला मारले. माहिती मिळताच पोलीस आणि गावकरी तेथे पोहोचले परंतु यात महिला आणि साप दोघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उरगा पोलीस स्टेशन हद्दीतील धनधानी गावात राहणाऱ्या पैशीबाईचा सर्पदंशाने मृत्यू झाला. नातेवाइकांनी सांगितले की, ती जवळच्या जंगलात गेली होती जिथे तिला विषारी नागाने दंश केला. यानंतर महिलेनेही प्रत्युत्तर देत सापाला काठीने मारले. कुटुंबीय तेथे पोहोचले असता त्यांनी देखील या कोब्रा सापाला वेदनेत विव्हळताना पहिले. नातेवाइकांनी रुग्णवाहिका बोलावून पीडितेला मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही.
पोलिसांनी लिहून घेतली एफआयआर तसेच मृत व्यक्तीच्या पोस्टमार्टम रिपोर्टची तपासणी झाल्यानंतर सर्प दंश झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 4 लाखांची आर्थिक मदत केली जाते.