जाहिरात
मराठी बातम्या / देश / UP Election EXCLUSIVE: राज्याचा विकास, महिलांची सुरक्षा नको असणारे 20% लोकच भाजप विरोधी; योगी आदित्यनाथांचं परखड मत

UP Election EXCLUSIVE: राज्याचा विकास, महिलांची सुरक्षा नको असणारे 20% लोकच भाजप विरोधी; योगी आदित्यनाथांचं परखड मत

UP Election EXCLUSIVE: राज्याचा विकास, महिलांची सुरक्षा नको असणारे 20% लोकच भाजप विरोधी; योगी आदित्यनाथांचं परखड मत

‘ज्याला विकास आवडतो तो भाजपसोबत…’

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटना, 4 फेब्रुवारी : देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या निवडणुकीचे वारे देशभरात पसरताना दिसत आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh Election 2022) भाजपकडून पुन्हा योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान Network18 चे एमडी आणि ग्रुप एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांच्यासोबतच्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी अनेक मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त केलं. ही निवडणूक 80:20 असल्याचं मानलं जात आहे. दरम्यान विरोध करणारे ते 20 टक्के कोण असल्याचा सवाल राहुल जोशी यांनी योगींना केला. यावर योगी आदित्यनाथ म्हणाले की, ज्यांना गुंडा टॅक्स आवडतं, जे सुरक्षेसाठी धोका आहेत, ज्यांना दंगा आवडतो, अराजकता आवडते, चेहरा पाहून योजनेला विरोध करतात, ज्यांना मुलींची सुरक्षितता आवडत नव्हती ते भाजपला विरोध करीत आहेत.  80-20 चे स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की ज्याला विकास आवडतो तो भाजपसोबत येईल. भाजप सरकारने सुरक्षेचं वातावरण निर्माण केलं आहे, असंही ते पुढे म्हणाले. हे ही वाचा- हिजाब विरुद्ध भगव्या शालीचा वाद, कर्नाटकमधील शाळात चाललंय काय?

जाहिरात

अखिलेश आणि शिवपाल यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार न दिल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ते मॅच फिक्सिंग करून भाजपला रोखण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचा पर्दाफाश झाला आहे. मायावती यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आमचा त्यांच्यासोबत काहीही संबंध नाही. राज्याच्या योजनांबद्दल विपक्षच्या नेत्यांसोबत बातचीत केली जाते. मात्र निवडणूक हा वेगळा विषय आहे. अखिलेश यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, आणि मुलायम सिंह यांनाही भेटायला गेलो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात