नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम समाजाबद्दल मोठे विधान केले आहे. ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 के एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.
मुस्लिमांबद्दल काय म्हणाले योगी आदित्यनाथ -
उत्तरप्रदेश राज्यात कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे हिंदूंचे सण शांततेत आणि कार्यक्षमतेने साजरे केले जात आहेत, त्याचप्रमाणे मुस्लिमांचे सणही चांगल्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. राज्यात मुलींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या तर हिंदू मुलींबरोबरच मुस्लिम मुलींनाही त्याचा लाभ मिळत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे हाच मुस्लिमांना एकत्र करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच सरकारने पिक एंड चूजचे धोरण टाळावे. कोणाचेही तुष्टीकरण हा लोकशाहीचा आत्मा नाही. लोकशाही सर्वांच्या पाठिंब्यावर, सर्वांचा विकास आणि सर्वांच्या प्रयत्नावर चालते, असे ते म्हणाले.
ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 के एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचा विकासाच्या ब्लू प्रिंटबद्दल योगी आदित्यनाथ खुलासा केला आहे. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून सल्ला दिला.
राहुल गांधींना दिला हा सल्ला -
'1947 पासून राहुल गांधी काय करत होते. देशात जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर क्षेत्र आणि भाजेचा आधार घेऊन फाळणी तर काँग्रेसच्या काळात झाली आहे. जे त्यांना वारस हक्काने मिळालं आहे, ते देशाला परत करत आहे. हे तेच करत आहे. राहुल गांधी हे आपली नकारात्मक प्रतिमा सोडली तर काँग्रेसला फायदा होईल. पण, ते तसं करत नाही. ते त्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरत आहे.
कोणत्या कार्यक्रमामध्ये गर्दी असणे म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळाला असं नसतं. सर्व सामन्य लोकांवर याचा काय फरक पडला, त्यांनी याचा कसा विचार केला हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. पण, देशाला त्यांनी त्यांचा हेतू काय आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींना फटकारलं.
हेही वाचा - अशा लोकांना उत्तर प्रदेशच्या जनतेने वारंवार नाकारलं; योगी आदित्यनाथ यांचा इशारा नेमका कोणाकडे?
विकास कामावरून लक्ष हटवण्यासाठी रामचरित मानस याच्यावर विधानं केली जात आहे. लोकसभेमध्ये जेव्हा याचे प्रश्न येईल, तेव्हा त्याचे उत्तर दिले जाईल. रामचरित मानस हे पवित्र ग्रंथ आहे. त्याच्याबद्दल मोठी आस्था आहे, उत्तर भारतातील प्रत्येक घरात मंगल कार्य होते, तेव्हा याचे पठण केले जात असते. राम चरित्र हे लोकांना जोडणारे आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गावात राम चरित्र मानसाचे वाचन केले जात आहे. रामचरित मानसमध्ये निसाद राज आणि शबरीचे सुद्धा चित्र आहे. हे बुद्धीचा फेरा आहे. ज्या लोकांना राम चरित्र मानसाची माहिती असती तर त्यांनी यावर आक्षेप घेतला नसता, टीका केली नसती, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Politics, Uttar pradesh, Yogi Aadityanath, Yogi government