अमरनाथ : केदारनाथसारखा विद्ध्वंस, मनुष्यहानी अमरनाथजवळही झाली असती. मात्र कोरोनामुळे यात्रा बंद असल्यानेच शेकडो जीव वाचल्याचं दिसून येत आहे.जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अमरनाथ (Amarnath) परिसरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळं (Heavy rains) सिंधु नदीच्या (sindhu river) पाणीपातळीत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यात अमरनाथमध्ये ढगफुटी (Cloud burst) झाल्यामुळे जोरदार पाऊस झाला आहे. परिणाम सिंधु नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून SDRF च्या टीमला पाचारण करण्यात आलं आहे. SDRF च्या दोन टीम अगोदरपासूनच अमरनाथमध्ये तैनात आहेत.
#WATCH Cloudburst hits near the Amarnath cave in Jammu and Kashmir; No loss of life reported
— ANI (@ANI) July 28, 2021
Two SDRF teams are present at the cave; One additional team of SDRF deputed from Ganderbal
(Video source: Disaster Management Authority, J&K) pic.twitter.com/UgtOOoGAZG
नेमकं काय घडलं? सतत सुरु असणारा पाऊस आणि ढगफुटी यामुळे गंड आणि कंगन परिसरातील नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरातून कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नसलं तरी ग्रामस्थांना नदीपात्रापासून शक्य तितक्या दूर राहण्याचा सल्ला प्रशासनानं दिला आहे. पाण्याची पातळी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून SDRF च्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी त्यांनी फोनवरून बातचित करून परिस्थितीचा आढावा घेतल्याचं सांगितलं जात आहे.
बाबा अमरनाथ की पवित्र गुफा के पास बादल फटने के संबंध में मैंने जम्मू-कश्मीर के LG श्री मनोज सिन्हा जी से बात कर जानकारी ली है। राहत कार्यों व स्थिति के सटीक आकलन के लिए NDRF की टीमें वहाँ भेजी जा रही हैं।
— Amit Shah (@AmitShah) July 28, 2021
किश्तवाडमध्येही ढगफुटी जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातदेखील ढगफुटी होऊन त्यात नागरिकांचा बळी गेला आहे. आतापर्यंत किश्तवाडमधील वेगवेगळ्या भागातून 7 मृतदेह सापडले असून अनेकजण बेपत्ता आहेत. तर 17 गंभीर जखमींवर उपचार सुरु आहेत. मुसळधार पावसामुळे शोधमोहिम थांबवण्यात आली होती. आता ती पुन्हा सुरु करण्यात आली आहे. हे वाचा - 14 जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून दिलासा मिळण्याची शक्यता नागरिकांनी नदीपात्रापासून दूर राहावं आणि पावसात कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.