Jammu-Kashmir: अवंतीपोरात आणखी एक चकमक, सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

Jammu-Kashmir: अवंतीपोरात आणखी एक चकमक, सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमधील (Jammu kashmir)अवंतीपोराच्या त्राल परिसरातील नौबुग याठिकाणी शुक्रवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत 2 अज्ञात दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं असून ही चकमक अद्याप सुरूच आहे.

  • Share this:

अवंतीपोरा, 09 एप्रिल: काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील हल्ल्याची (Terrorist Attack) घटना ताजी असताना आज पुन्हा जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) अवंतीपोराच्या त्राल परिसरातील नौबुग येथे शुक्रवारी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक (Firing) झाली आहे. या चकमकीत आतापर्यंत 2 अज्ञात दहशतवाद्यांना ठार (Terrorist death in firing) करण्यात आलं आहे. ही चकमक अद्याप सुरू असून अधिकच्या माहितीचा खुलासा करण्यात आला नाही.

न्यूज 18 इंडियाचे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी माहिती दिली की, चकमकीच्या ठिकाणी 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवंतीपोराच्या संबंधित परिसरात आतंकवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सीआरपीएफ, सैन्य आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे. दहशतवादी लपून बसलेल्या परिसराला सैन्य दलाने चारी बाजूंनी घेरलं असून कारवाई केली जात आहे, अशी माहितीही रिफत यांनी दिली आहे.

शोपियांतील चकमकीत तीन दहशतवादी ठार

काल (गुरुवारी) जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन अज्ञात अतिरेक्यांना ठार करण्यात आलं आहे. दरम्यान एक सुरक्षा जवानही जखमी झाले होते. बाबा मोहल्ल्यात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने संबंधित परिसराला वेढा दिला आणि शोधमोहीम राबवली, अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे.

हे वाचा- पाकिस्तानला धडकी भरवणारा VIDEO, भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केल्या 10 चौक्या

सुरक्षा दलाने वेढा दिल्याचं लक्षात येताचं दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाने जवाबी कारवाई केली आणि चकमकीला सुरुवात झाली. या गोळीबारात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यानं दिली आहे. दुसरीकडे सुरक्षा दलाच्या कारवाईत तीन अतिरेकी ठार झाले आहे. ठार केलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. अद्याप या घटनेची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी गटानं घेतली नाही.

Published by: News18 Desk
First published: April 9, 2021, 9:38 AM IST

ताज्या बातम्या