मराठी बातम्या /बातम्या /देश /

शाळा आहे, पण छत नाही! कडाक्याच्या उन्हात 450 मुले झाडाच्या सावलीत घेतायेत शिक्षण...

शाळा आहे, पण छत नाही! कडाक्याच्या उन्हात 450 मुले झाडाच्या सावलीत घेतायेत शिक्षण...

उन्हाचा कडाका आणि सतत वाढत जाणारे तापमान यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. (rise in temprature) तर बुलंदशहरमध्ये (bulandshahar) अशी एक प्राथमिक शाळा आहे बेजबाबदारपणा दिसून आला आहे.

  • Published by:  News18 Desk

बुलंदशहर, 30 एप्रिल : उन्हाचा कडाका आणि सतत वाढत जाणारे तापमान यामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. (rise in temprature) तर बुलंदशहरमध्ये (bulandshahar) अशी एक प्राथमिक शाळा आहे जिथे बेजबाबदारपणा दिसून आला आहे. येथे कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना झाडांच्या साहाय्याने अभ्यास करावा लागत आहे. या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर छत नाही. तसेच या कडाक्याच्या ऊनपासून बचाव करण्यासाठी कोणताच व्यवस्था नाही. तसेच स्वच्छतेसाठी सुद्धा कोणतीच व्यवस्था नाही.

एकीकडे 'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया', असा नारा सरकार देत असताना बुलंदशहरमधील परिस्थिती जेव्हा समोर येत आहे, येथील लोकांचा बेजबाबदारपणा समोर येत आहे, त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे इतक्या अडचणींमध्ये विद्यार्थी कसे शिकणार आणि पुढे कसे जाणार, अशी चर्चा सुरू आहे. या संपूर्ण परिस्थितीमुळे येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी अखंड प्रताप सिंह यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही केली जात आहे.

शिक्षकांचे म्हणणे काय?

एककडे या कडाक्याच्या उन्हात डॉक्टर लोकांना उन्हापासून दूर राहण्याचा सल्ला देत असताना या शाळेत शिकणारी मुले उन्हापासून वाचण्यासाठी झाडाच्या साहाय्याने अभ्यास करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शाळेतील जीर्ण खोल्यांमुळे ते पाडण्यात आले. मात्र, या विद्यार्थ्यांना दुसऱ्या कोणत्याच इमारतीमध्ये जागा देण्यात आली नाही. तसेच वेळेत ही शाळेतील वर्गांचे बांधकामही पूर्ण झालेले नाही, असे पहासू नगर येथील क्रमांक 1च्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे म्हणणे आहे. याचाच परिणाम असा की, काही विद्यार्थ्यांना झाडाच्या सावलीत शिक्षण घ्यावे लागत आहे तर काही विद्यार्थ्यांना येथील स्वयंपाकघरात शिक्षण घेत आहेत.

हेही वाचा - Weather Update : मे 2022 मध्ये देशातील 'या' भागात ऊन तर 'या' ठिकाणी पडणार पाऊस

विद्यालयाचे मुख्याध्यापक गिरीश कुमार शर्मा म्हणाले की, या शाळेत 450 विद्यार्थी शिकत आहेत. शाळेच्या खोल्या मोडकळीस आल्याने त्यांचा लिलाव करून त्या पाडण्यात आल्या. मात्र, त्यानंतर आजतागायत येथे खोल्या बांधता आलेल्या नाहीत. तर उन्हामुळे या बालकांचे प्रचंड हाल होत आहेत. आता या खोल्या बांधून देण्याचा निर्णय कधी घेण्यात येतो आणि त्या कधी बांधल्या जातात, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Rise in temperatures, School children