• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • ऑनलाइन गेमचा नाद भोवला; शाळेच्या गेटवरून उडी मारताना मुलाच्या पोटात घुसला रॉड, जागीच मृत्यू

ऑनलाइन गेमचा नाद भोवला; शाळेच्या गेटवरून उडी मारताना मुलाच्या पोटात घुसला रॉड, जागीच मृत्यू

शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवर बसून मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलानं अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी लोखंडी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो मुख्य गेटमध्ये लावलेल्या टोकदार लोखंडी रॉडवर पडला.

 • Share this:
  कोरबा, 24 सप्टेंबर : मोबाईलवर फ्री फायर ऑनलाइन गेम (Online Game) खेळत असलेल्या मुलानं शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारली. मात्र, उडी चुकल्यामुळं त्याच्या पोटात मुख्य गेटवर बसवलेला लोखंडी रॉड घुसला. लोक त्याला मदत करण्यासाठी पोहोचले. मात्र, त्याचा आधीच मृत्यू (school boy death) झाला होता. राहुल वैष्णव असं या 14 वर्षीय मुलाचं नाव आहे. तो नवव्या इयत्तेत शिकत होता. अचानकपणे पाऊस सुरू झाल्यानं त्यानं शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारली. शाळेच्या कुंपणाच्या भिंतीवर बसून मोबाईलवर गेम खेळणाऱ्या मुलानं अचानक आलेल्या पावसापासून वाचण्यासाठी लोखंडी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे तो मुख्य गेटमध्ये लावलेल्या टोकदार लोखंडी रॉडवर पडला. रॉड पोटातून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्तीसगडच्या (Chhattisgarh) कोरबा (Korba) जिल्ह्यातील दरारी पोलीस स्टेशन परिसरातील राजीव नगर येथील शाळेची आहे. हे वाचा - Pensioners ना आता No Tension! घरबसल्या जमा करता येईल वार्षिक जीवन प्रमाणपत्र राहुल त्याच्या तीन मित्रांसह सरकारी शाळेच्या पटांगणाच्या कुंपणाच्या भिंतीवर चढून मोबाईलवर गेम खेळत होता. त्याच्या मित्रांच्या मते, अचानक जोरदार गडगडाटासह पाऊस सुरू झाला. भिजण्यापासून वाचण्यासाठी राहुलनं सहा फूट उंच लोखंडी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळं तो गेटमधील धारदार रॉडवर पडला आणि रॉड त्याच्या पोटातून गेला. मुलाची स्थिती पाहून आई झाली बेशुद्ध राहुलच्या मित्रांनी पोटात घुसलेल्या गेटच्या रॉडमधून त्याला कसा तरी बाहेर काढून घरात आणले. राहुलची अवस्था पाहून त्याची आई राधिका बेशुद्ध पडली. मुलाला घाईघाईने वीज कंपनीच्या एचटीपीपी येथील विभागीय रुग्णालयात नेण्यात आलं. इथं डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे वाचा - चर्चेत असलेल्या ‘फ्रेशवर्क्स’नं 500 कर्मचाऱ्यांना बनवलं कोट्यधीश, कोण आहे कंपनीचा संस्थापक; वाचा सविस्तर या प्रकरणी राहुलच्या मित्रांचे जबाब नोंदवले जात आहेत. प्रथमदर्शनी पोलीस या घटनेला अपघात मानत आहेत. मात्र, इतर काही प्रकार घडला असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी पोलीस शाळेच्या आवारातील आजूबाजूच्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब घेण्याची तयारी करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: