Home /News /national /

हृदयद्रावक! पिठाच्या गिरणीच्या रोलरमध्ये अडकून बालमजुराचा दुर्दैवी अंत, कटरने चक्की कापून बाहेर काढला मृतदेह

हृदयद्रावक! पिठाच्या गिरणीच्या रोलरमध्ये अडकून बालमजुराचा दुर्दैवी अंत, कटरने चक्की कापून बाहेर काढला मृतदेह

वाचूनच अंगावर काटा येईल आणि हृदयात कालवाकालव होईल, अशी बातमी. कितीही कायदे केले तर बालकामगार, बालमजुरी अजून थांबलेली नाही.

    जयपूर, 04 जानेवारी: खेळायच्या आणि हुंदडायच्या वयात घराची जबाबदारी उचलणाऱ्या एका बाल मजुराचा दुर्दैवी मृत्यू (Child labour) झाला आहे. पिठाच्या गिरणीत (Flour mill) अडकल्यानेने त्याला जीव गमवावा (Death) लागला आहे. पोत्यातील गव्हाचं वजन जास्त असल्यानं त्याला तोल आवरता आला नाही. त्यामुळे गव्हासोबत तोही गिरणीत पडला. यामुळे गिरणीच्या रोलरमध्ये अडकल्याने या चिमुकल्याचा जीव गेला आहे. आईच्या तक्रारीनंतर गिरणी मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही हृदयद्रावक घटना राजस्थानमधील आहे. जयपूरनजीक असणाऱ्या नहारगड गावातील एका पीठाच्या गिरणीच्या रोलरमध्ये अडकल्यामुळं बाल मजुराचा मृत्यू झाला आहे. या मृत मुलाचं नाव अमित आहे. हा अपघात इतका भयावह होता की गिरणीच्या रोलरमध्ये अमितचं हात आणि कंबर गुंडाळली गेली होती. मशीनच्या बाहेर फक्त त्याचे पाय आणि डोकंच दिसत होतं. तेथील इतर कामगारांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना मृतदेह बाहेर काढता आला नाही. म्हणून पोलिसांनी सिव्हील डिफेंसच्या टीमला पाचारण केलं. या टीमनं दोन तास अथक प्रयत्न केल्यानंतर गिरणीला कटरने कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत मुलाची आई रेखादेवी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गिरणी मालक रमेश कुलवाल आणि तरुण कुलवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत अमितच्या कुटुंबियांनी सांगितलं की, गेल्या दोन महिन्यांपासून अमित संबंधीत गिरणीत पिठाचं वजन करण्याचं काम करत होता. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यानं पिठाच्या गिरणीजवळ उंचावर ठेवलेलं धान्याचं पोतं खाली उतरवलं. पण त्या पोत्याचं वजन खूपच जास्त असल्यानं त्याचा तोल सुटला आणि तो गव्हासहित गिरणीत पडला. यावेळी तो जोरात ओरडला पण काही कळायच्या आत या चिमुकल्याचा जीव गेला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Child labour

    पुढील बातम्या