जंजगीर चंपा (लखेश्वर यादव), 06 मे : छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका लग्न सोहळ्यात पोलिसांनी थेट नवऱ्या मुलग्याला अटक केलं आहे. याप्रकरण चौकशी केली असता लग्नाच्या बहाण्याने मैत्रिणीवर तरुणाने पाच वर्षे बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रेयसीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्यावर तिला धमकावत तो दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता.
यावेळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील लोहारसी गावातील रहिवासी असलेल्या दुसऱ्या सोसायटीतील एका मुलीची खारोद येथील रहिवासी निरंजन आदित्यशी ओळख झाली. यातून दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले.
ऑनलाइन गेममध्ये गमावले पैसे, तरुणाने तलावात उडी मारून संपवलं जीवन; छत्रपती संभाजीनगरमधील घटना2018 पासून तरुण लग्नाच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार करत होता, तरुणी जेव्हाही लग्नाबाबत बोलायची तेव्हा तो तरुण कोणत्या ना कोणत्या बहाण्याने प्रकरण पुढे ढकलायचा. या दरम्यान त्या मुलीला न सांगता मुलगा दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता.
हा प्रकार तरुणीला कळताच तिने पोलीस ठाणे गाठून पोलिसांना सर्व माहिती दिली. आणि निरंजन आदित्य या युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवला.
मृतदेहाचे 9 तुकडे अन् मानवी कवटी ‘त्या’ अंगणवाडी सेविकेची? पोलीस गुंतले तपासातलग्नाच्या मिरवणुकीची तयारी सुरू असतानाच पोलीस आले व वऱ्हाडीला अटक करून पोलीस ठाण्यात आणले, चौकशी केल्यानंतर आरोपी युवक निरंजन आदित्यने आपला गुन्हा मान्य केला. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.